कोपरगाव येथील डॉक्टरसह ७ जण क्वॉरण्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:26 PM2020-06-11T22:26:19+5:302020-06-12T00:26:10+5:30
सिन्नर : कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या पाथरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्या खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरसह सात जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
सिन्नर : कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या पाथरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्या खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरसह सात जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
पाथरे खुर्द येथील रहिवासी असलेल्या वृद्धास कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्या पथकाने तो रुग्ण दाखल असलेल्या खासगी रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांना होम क्वॉरण्टाइन राहण्याच्या सूचना केल्या. सदर रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला असताना आजूबाजूला असलेल्या सहा रुग्णांच्यादेखील संपर्कात आल्याने घरी गेलेल्या त्या रुग्णांनादेखील परत बोलवण्यात आले असून, त्यांनाही कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
रुग्णालयातील डॉक्टरसह ७ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी पीपीई सुरक्षा कवच घातल्यामुळे ते बचावले. आता पाथरे गावात अन्य नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
\-----------------------
पाथरे गाव ४ दिवस लॉकडाऊन
पाथरे गावात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बुधवारी सकाळी भाजीपाला बाजार स्थगित करण्यात आला. यावेळी आलेल्या विक्रेत्यांना निघून जायला सांगण्यात आले. तिन्ही गावांतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत गावात चार दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. या काळात वैद्यकीय सेवावगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वेळीदेखील २ रुग्ण आढळल्यावर दोन आठवडे पाथरे खुर्द, बुद्रुक व वारेगाव ही गावे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर बाहेरून व्यवसायासाठी येणाºयांनादेखील बंदी घालण्यात आली होती.