बसमध्ये चढताना ७ विद्यार्थी पडले : चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:44 PM2017-09-15T15:44:55+5:302017-09-15T15:45:36+5:30

7 students fall asleep in bus: driver crushes | बसमध्ये चढताना ७ विद्यार्थी पडले : चालकाला मारहाण

बसमध्ये चढताना ७ विद्यार्थी पडले : चालकाला मारहाण

Next


पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात ७ विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि.१५) सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलिस पथक दाखल झाल्यानंतर समझोता होऊन बससेवा पुर्ववत सुरू झाली.
बसचालकाने बस थांब्यावर थांबविली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान या प्रकारानंतर आडगाव परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आडगावमधुन नाशिकला नोकरी-शिक्षण कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करणारे प्रवासी आहेत. पुर्वी या मार्गावर मुबलक बस होत्या, मात्र आर्थिक तोट्याचे कारण पुढे करुन नाशिक आगाराने बसफेºया कमी करण्यात आल्या आहेत. त्यातच मात्र बसचालक बस थांब्यावर बस न थांबविता पुढे नेऊन थांबवित आहेत. शुक्र वार (दि.१५) सकाळच्या सुमाराला काही महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी बस थांब्यावर थांबलेले असतांना ओझरकडून नाशिकला जाणारी बस आली मात्र ती बस थांब्यावर न थांबल्याने काही विद्यार्थी बसमागे धावत धावत्या बसमध्ये चढले तरी देखील चालकाने बस न थांबविल्याने अमोल पुरकर, बाळा जाधव या दोघा विद्यार्थ्यांसह ७ विद्यार्थी तोल जाऊन बसमधून खाली पडले. यात विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला व कमरेला किरकोळ मार लागला आहे.
सकाळच्या सुमाराला आडगाव बसथांबा परिसरात ग्रामस्थांची वर्दळ असल्याने बसमधून विद्यार्थी पडल्याचे निदर्शनास येताच काही ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांना उचलले.त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बसचालकाला मारहाण करून आडगावातून जाणाºया सय्यद पिंप्री, सायखेडा, ओझर, विंचूर गवळी, मोहाडी या बस थांबवून अर्धा ते पाऊणतास बससेवा बंद पाडली.
सदर घटनेनंतर एसटीचे अधिकारी व आडगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवासी, नागरिक यांच्याशी चर्चा करत आश्वासन दिल्याने वाद मिटला व बससेवा पुर्ववत सुरू झाली. आडगावातून नाशिकला जाणाºया बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी करूनही त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: 7 students fall asleep in bus: driver crushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.