आरटीई प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मूदतवाढ आतापर्यंत 70 टक्के प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:00 PM2018-04-10T19:00:33+5:302018-04-10T19:00:33+5:30

Up to 70% admission till date for RTE admission till April 13 | आरटीई प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मूदतवाढ आतापर्यंत 70 टक्के प्रवेश

आरटीई प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मूदतवाढ आतापर्यंत 70 टक्के प्रवेश

Next
ठळक मुद्देआरटीई प्रवेशासाठी पुन्हा मूदतवाढ पहिल्या फेरीत आतापर्यंत 70 टक्के प्रवेश उर्वरित विद्यार्थ्यांसाठी 13 एप्रिलपर्यंत मूदत

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रिये अंतर्गत पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्याथ्र्यापैकी आतार्पयत सुमारे 70 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 89 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेशाची संधी मिळूनही आतापर्यंत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या 3 हजार विद्याथ्र्यापैकी 2 हजार 89 विद्यार्थ्यांच्या पालकांनी 10 एप्रिलर्पयत त्यांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ दिल्यामुळे आता संबंधित शाळांनाही 13 एप्रिलर्पयत प्रवेशाची सर्व प्रक्रि या पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीचा अहवाल शिक्षण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींविषयी प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतर दुसरी सोडत जाहीर केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी यावर्षी सर्वाधिक 10 हजार 416 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले असून, एका विद्यार्थ्यांची केवळ एकाच शाळेत लॉटरी जाहीर झाली आहे. त्यानुसार पहिल्या सोडतीत आतार्पयत 2 हजार 89 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, 13 एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येईल. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतवाढीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात आली असून, पालकांना आरटीईच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.


सोडतीत प्राप्त जागेवर प्रवेश अनिवार्य
शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणो अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतला नाही त्या पाल्यांचे प्रवेश पुढील सर्व फे:यांसाठी अपात्र ठरणार आहेत. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील 6 हजार 589 जागांसाठी पहिल्या फेरीनंतर अजून दुसरी व तिसरी सोडत जाहीर केली जाणार आहे.

Web Title: Up to 70% admission till date for RTE admission till April 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.