७० टक्के अत्याचार परिचितांकडून...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:54+5:302021-03-14T04:14:54+5:30

महिला सक्षमीकरणाबाबत वारंवार समाजात वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा घडतात. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. शहर व परिसरात ...

70% atrocities by acquaintances ...! | ७० टक्के अत्याचार परिचितांकडून...!

७० टक्के अत्याचार परिचितांकडून...!

Next

महिला सक्षमीकरणाबाबत वारंवार समाजात वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा घडतात. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. शहर व परिसरात सातत्याने घडणाऱ्या विनयभंग व बळजबरीने शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्ये परिचयाच्या व्यक्तींकडून गुन्हे घडल्याचे पोलीस तपासात पुढे आलेले आहे. काही दिवसांपूर्वी चक्क एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा शहरातील सीबीएस सिग्नलजवळील एका हॉटेलच्या खोलीत खून केल्याचे उघडकीस आले होते. सुरुवातीला परस्परविरुद्धलिंगी आकर्षणातून होणारी मैत्री आणि पुढे जाऊन मैत्रीचे प्रेमात होणारे रूपांतर मग एकमेकांच्या साथीने जीवन जगण्याची दाखविली जाणारी स्वप्ने आणि त्यातून घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा आलेख हा सातत्याने चढता राहिलेला दिसतो.

लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने विवाहपूर्व शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कायद्यातील कलम-३७६ नुसार शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत बलात्काराचे गुन्हे यापूर्वी दाखल झालेले आहेत आणि यावर्षीही होत आहेत. समाजात वावरणाऱ्या महिलांना अशा प्रकारच्या अत्याचारांना दररोजच सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.

---इन्फो--

सोशल मीडियाही ठरतोय कारणीभूत

सोशल मीडियादेखील अनेकदा महिलांच्या अत्याचाराला कारणीभूत ठरत असल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, डेटिंग ॲपच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींसोबत होणारी मैत्री त्यातून वाढीस लागणारा संवाद आणि कधी होणारी आर्थिक फसवणूक तर कधी शारीरिक अत्याचारासारखे गुन्हेही घडतात. यामुळे तरुणी, महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना अधिकाधिक खबरदारी व सतर्कता बाळगणे तितकेच गरजेचे आहे. सोशल मीडियावर आपली छायाचित्रे अपलोट करतानाही पुरेशी ‘सिक्युरिटी’ची दक्षता बाळगणे महत्त्वाचे असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

----

वर्षनिहाय आकडेवारी अशी

बलात्कार - वर्ष- २०१९-५३/ २०२०-५५

विनयभंग -वर्ष- २०१९-१८८/ २०२०-१७४

हुंडाबळी- वर्ष- २०१९- १५८ / २०२०-१७५

---

फोटो आर वर १३क्राईम/१३क्राईम१ नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

130321\13nsk_23_13032021_13.jpg

===Caption===

महिला अत्याचार

Web Title: 70% atrocities by acquaintances ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.