चांदोरी प्राथमिक केंद्राअंतर्गत ७० व्यक्ती कोरोना मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 09:03 PM2020-08-25T21:03:51+5:302020-08-26T01:14:59+5:30
चांदोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यभरात कोरोना योद्धे डॉक्टर,परिचारिका व आरोग्य सेवक कोरोना बाधित होत आहे, पण आनंदाची बाब अशी की कोरोनावर मात करण्याची संख्या अधिक आहे.
चांदोरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यभरात कोरोना योद्धे डॉक्टर,परिचारिका व आरोग्य सेवक कोरोना बाधित होत आहे, पण आनंदाची बाब अशी की कोरोनावर मात करण्याची संख्या अधिक आहे.
चांदोरी येथील प्राथमिक केंद्राचे ३० वर्षीय आरोग्य सेवक यांचा मागील आठवड्यात कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यांनी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
चांदोरी येथील प्राथमिक केंद्रात सेवेसाठी दाखल होताच त्यांच्यावर फुले उधळून स्वागत करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद सवाई, संदीप पवार, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख तसेच परिचारिका व आरोग्यसेवक सिमा निफाडे, दीप्ती केदार, प्रमिला परदेशी, सादिया शेख, अनिता जमधडे, धनु दरेकर, शारु ख मणियार, अमोल नाठे, बाळासाहेब टर्ले, राजेंद्र खैरनार, प्रमोद मात्रे, भूषण गायकवाड आदी उपस्थित होते.
तसेच सद्य स्थितीला चांदोरी प्राथमिक आरोग्य व त्यांच्या संलग्न असलेल्या उपकेंद्रात एकूण ८२ कोरोना रु ग्ण आढळून आले. त्यातील ७० हुन अधिक रु ग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर ५ रु ग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या १२ रु ग्ण उपचार घेत आहे. अशी माहीती प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुकुंद सवाई यांनी दिली.