नाशकात ७० रुग्णालयांना लागले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:32 PM2018-04-21T15:32:40+5:302018-04-21T15:32:40+5:30

नियमांची अपूर्तता : ३१९ रुग्णालये ठरली अनधिकृत

70 hospitals in Nashik did not start | नाशकात ७० रुग्णालयांना लागले टाळे

नाशकात ७० रुग्णालयांना लागले टाळे

Next
ठळक मुद्दे महापालिका क्षेत्रातील रु ग्णालये, नर्सिंग होम्स, प्रसुतिगृहचालकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे व विहित कालावधीत परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक मनपा क्षेत्रातील ५८४ पैकी २६५ रु ग्णालयांनीच परवाना नुतनीकरण केले

नाशिक - महापालिकेने केलेल्या आवाहनानंतरही नियमांची पूर्तता करू न शकलेली ३१९ रुग्णालये अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. या रुग्णालयांना आता महापालिकेने रुग्णालय बंद करण्याच्या नोटीसा बजावल्या असून रुग्णांना दाखल करुन घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, ७० रुग्णालय चालकांनी आपली रुग्णालये बंद केल्याचे यापूर्वीच महापालिकेला कळविले आहे.
मुंबई सुश्रृषागृह अधिनियम १९४९ व सुधारीत नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रातील रु ग्णालये, नर्सिंग होम्स, प्रसुतिगृहचालकांनी महापालिकेकडे नोंदणी करणे व विहित कालावधीत परवाना नुतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना नुतनीकरणासाठी नगररचना व अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला देखील असणे आवश्यक आहे. परंतु महापालिका क्षेत्रातील अनेक जुनी रु ग्णालये, प्रसुतिगृह निवासी क्षेत्रात असल्यामुळे तसेच इमारतीच्या वापरात बदलाबाबत संबंधितांना ३१ मार्चच्या आत नोंदणी व नुतनीकरण सक्तीचे केले होते. मात्र, या कालावधीत मनपा क्षेत्रातील ५८४ पैकी २६५ रु ग्णालयांनीच परवाना नुतनीकरण केले. सुमारे ३१९ रु ग्णालयांनी नियमांची पूर्तता न केल्याने त्यांना अनिधकृत ठरविण्यात आले. त्यानुसार, संबंधितांना रु ग्णालय बंद करण्याच्या नोटीसाही काढल्या आहेत. या रु ग्णालयात रुग्णांना दाखल करून घेऊ नये अशा नोटीसा रु ग्णालयांबाहेर लावल्या जात आहेत.
संशयास्पद केंद्रांना नोटीसा
गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यानुसार, शहरातील सोनोग्राफी तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २६८ पैकी १४२ सोनोग्राफी केंद्रांची तर १२३ पैकी ४८ गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली असून संशयास्पद आढळलेल्या दोन सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

Web Title: 70 hospitals in Nashik did not start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.