७० लाखाची सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:33 PM2018-12-09T17:33:05+5:302018-12-09T17:33:09+5:30

येवला : येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ मधील परत गेलेली ६८ लाख ५,६०० रु पये सुवर्ण महोत्सव शिष्यवत्ती आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी दिली.

70 lakhs gold festival scholarships received | ७० लाखाची सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती प्राप्त

७० लाखाची सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती प्राप्त

Next
ठळक मुद्देया शिष्यवत्तीचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे.

येवला : येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ मधील परत गेलेली ६८ लाख ५,६०० रु पये सुवर्ण महोत्सव शिष्यवत्ती आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड यांनी दिली.
जिल्हा परिषद व आदिवासी विभाग नाशिक यांच्याकडे पाठपुरावा करुन तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रवीण गायकवाड यांची जिल्हा परिषद सदस्य असतांना शिक्षण विभागात पाठपुरावा केला. यामुळे मागील ५ हजार २८९ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यात चालु वर्षाचे ३ हजार ७१८ आदिवासी विद्यार्थ्यांचे ४ हजार ६५ रु पये येवला तालुक्यातील मुख्याध्यापक यांच्या खात्यावर जमा केले आहे. या शिष्यवत्तीचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना होणार आहे.
धामणगाव येथील महादेववाडी शाळेचा दर्जा सुधारला असून मुलांचे वाचन लेखन हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारले आहे. महादेववाडी येथे शासनाच्या दिनदयाळ उपाध्यय योजनेतुन घरो घरी मिटर बसवण्यात आले आहे. त्यात आता या वस्तीला व शाळेला पाण्यासाठी विहिरीचा प्रस्ताव तयार केला असून त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.
येथील आदिवासी बांधवाने वनपट्टे मंजूर केले होते. आज त्यांची शेती बघुन आनंद झाला व येथेच रोजगार असल्यामुळे १०० टक्के मुलांची शाळेत उपस्थिती आहे. कार्यक्र माचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र कोटकर यांनी केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण ठाकरे, रंजीत परदेशी, ज्ञानेश्वर वाघ, भावसिंग पवार, रामकृष्ण वाघमारे, ईश्वर ठाकरे, रामदास सोनवणे, संतोष गांगुर्डे, माणिक माळी, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते. (०९ येवला फोटो)

Web Title: 70 lakhs gold festival scholarships received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.