जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना ७० लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:50 AM2018-03-11T01:50:39+5:302018-03-11T01:50:39+5:30

निफाड : कोलकाता येथील द्राक्ष व्यापारी तारिक जुनेल अन्वर व विसम शब्बीर बेग यांनी सोळा द्राक्षे उत्पादकांना गंडा घातल्याने या दोघांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात सुमारे ७० लाख ४९ हजार ८७५ रुपयांच्या द्राक्षमालाचे पैसे न देता फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

70 lakhs for grape growers in the district | जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना ७० लाखांचा गंडा

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना ७० लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देद्वारकानाथ जगन्नाथ काकडे यांनी फिर्याद दाखल केली चेक मात्र नमूद तारखेला वटला नाही

निफाड : कोलकाता येथील द्राक्ष व्यापारी तारिक जुनेल अन्वर व त्याच्यासोबत पायलट म्हणून काम करणारा विसम शब्बीर बेग (रा. खेडे उगाव) यांनी निफाड, येवला व चांदवड तालुक्यांतील सोळा द्राक्षे उत्पादकांना गंडा घातल्याने या दोघांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात सुमारे ७० लाख ४९ हजार ८७५ रुपयांच्या द्राक्षमालाचे पैसे न देता फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. शनिवारी (दि. १०) त्या संदर्भात निफाड पोलिसांत याबाबत चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील द्राक्ष उत्पादक द्वारकानाथ जगन्नाथ काकडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत, कोलकाता येथील व्यापारी तारिक जुनेल अन्वर शिवडी येथे राहत होता. त्याने द्राक्षमालाचा व्यवहार केला. ठरल्याप्रमाणे द्राक्षमाल काढून झाल्यानंतर पंधरा दिवसांत पूर्ण पैसे देण्याचे कबूल केले. जानेवारीत चार लाख ३७ हजार ७८० रुपयांची द्राक्षमाल उगाव येथील ट्रान्स्पोर्टमधून पाठविला. त्यानंतर तारिकने चेक दिला. मात्र नमूद तारखेला तो वटला नाही. त्यानंतर वेळोवेळी तारिक अन्वर व शब्बीर बेग यांच्याकडे रकमेची मागणी केली; मात्र त्यांनी आज देतो, उद्या देतो असे सांगत वेळ मारून नेली. पैसे न देता विश्वासघात करत फसवणूक करून दोघेही पळून गेले. दोघांनीही निफाड तालुक्यातील उगाव येथील शिवलाल भाऊसाहेब ढोमसे, राजेंद्र बबनराव कोंढरे, कानडी, ता. येवला, ज्ञानेश्वर पंढरीनाथ भालेराव, वडनेरभैरव, ता. चांदवड, विनायक निवृत्ती शिंदे, देवरगाव, ता चांदवड , दत्तात्रय बाबुराव थोरात दरसवाडी ता चांदवड , संपत गोपीनाथ शिंदे देवरगांव ता चांदवड , गोविंद धोंडीराम शिंदे देवरगांव ता चांदवड ,शिवाजी भिकाजी कोतवाल जोपुळ ता चांदवड , विनायक रंगनाथ शिंदे देवरगांव ता चांदवड , वाल्मिक साहेबराव शिंदे देवरगांव ता चांदवड , दिलिप पंढरीनाथ शिंदे देवरगांव ता चांदवड , अण्णासाहेब इंद्रभान शिंदे देवरगांव ता चांदवड , रामेश्वर मधुकर शिंदे देवरगांव ता चांदवड , बाबाजी लक्ष्मण खैरे बाळापुर ता येवला , रमन शंकर शिरसाठ बाळापुर ता येवला या सर्व द्राक्ष उत्पादकांचेद्राक्षमालाचे पैसे न देता तोडी आश्वासन देऊन पलायन केले म्हणुन फिर्याद दाखल केली आहे सदर गुन्हा निफाड पोलिसांत नोंदविण्यात आला आहे याबाबत तपास पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवा व्ही बी निकम हे करत आहे

Web Title: 70 lakhs for grape growers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा