७० थकबाकीदारांच्या मिळकती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:04 AM2018-03-16T01:04:25+5:302018-03-16T01:04:25+5:30

नाशिक : महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकीदारांनी रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.

70 seized of seized property | ७० थकबाकीदारांच्या मिळकती जप्त

७० थकबाकीदारांच्या मिळकती जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची विक्री

नाशिक : महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकीदारांनी रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.
महापालिकेने मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी थकविणाºया मिळकतधारकांविरुद्ध मोहीम आरंभली आहे. त्यात प्रामुख्याने, लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाºयांकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. आतापर्यंत सहाही विभागमिळून ७० मिळकतींवर जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याबाबतची माहिती देताना दोरकुळकर यांनी सांगितले, नाशिकरोड विभागातील सुजाता बिर्ला हॉस्पिटल (१० लाख ३८ हजार), ब्ल्यू पोर्ट प्रा. लिमिटेड (४ लाख), सिडको विभागातील दातार स्विचगिअर (३ लाख ६१ हजार), डॉ. कांतीलाल धाडीवाल (५ लाख २५ हजार), स्वरूप स्टील (८ लाख ४७ हजार), सागर मिल (४ लाख ६ हजार), सातपूर विभागातील शिवम टॉकीज (२ लाख ६६ हजार). महापालिकेने शहरातील ९० हजार मिळकतधारकांना सूचनापत्रे पाठविली आहेत. त्यानंतरही भरणा न केल्यास जप्तीची कारवाई करण्यात येते. जप्तीनंतर २१ दिवसांत रकमेचा भरणा न केल्यास लिलाव काढून मालमत्ता विक्री करण्यात येते. त्यापूर्वी, सदर मालमत्तेची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन, तलाठी कार्यालय, मुद्रांक विभाग यांनाही कळविली जाते. त्यानंतर सदर मालमत्तेचे मूल्यांकन करून जाहीर लिलावाची नोटीस काढण्यात येते. त्यानंतर मालमत्तांची विक्री केली जाते. महापालिकेने आता केवळ जप्तीची कारवाई न करता थेट मालमत्तांची विक्रीच करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
- रोहिदास दोरकुळकर, उपआयुक्त

Web Title: 70 seized of seized property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.