विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षातील ७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:59 PM2020-09-16T23:59:04+5:302020-09-17T01:23:23+5:30

नाशिक - विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वषार्चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात ७० टक्के विद्यार्थी अनुत्तरीत पुनर्विलोकन करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष अ­ॅड.गौरव गोवर्धने व कार्याध्यक्ष किरण फडोळ यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र समन्वयक प्रशांत टोपे यांना देण्यात आले.

70% students fail in the fourth year of law course | विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षातील ७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षातील ७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

googlenewsNext
ठळक मुद्दे विधी शाखेच्या २०१४ च्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले.

नाशिक - विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वषार्चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात ७० टक्के विद्यार्थी अनुत्तरीत पुनर्विलोकन
करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष अ­ॅड.गौरव गोवर्धने व कार्याध्यक्ष किरण फडोळ
यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र समन्वयक प्रशांत टोपे यांना देण्यात आले.
गेल्या शैक्षणिक वर्षात कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच कोर्सेस च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा वगळता अगोदरच्या वर्षांच्या
विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन आणि ५० टक्के मागील वषार्तील गुणांची सरासरी असे सूत्र लावत सर्व
विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले आहेत. मात्र विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या आणि २०१४ च्या पॅटर्न प्रमाणे
अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांना १०० गुणांची लेखी परीक्षा असल्या कारणाने त्यांना अंतर्गत मुल्यमापन होऊ शकत नाही. असे असताना
विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांसाठी कोणते सूत्र वापरण्यात आले याचे स्पष्टीकरण जाहीर नकरता विद्यापीठाकडून विधी शाखेच्या २०१४ च्या
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आले. या निकालांमध्ये जवळपास ७०टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण करण्यात आले आहे.
एकप्रकारे या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या निकालाचे पुनर्विलोकन करून या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतीत
विद्यापीठाने तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी तुषार जाधव, गोरख ढोकणे, रमीज पठाण, गोरक्ष जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: 70% students fail in the fourth year of law course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.