कृष्णाजी माउली दिंडीचे त्र्यंबककडे प्रस्थान ७० वर्षांची परंपरा : हजारो भाविक सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:49 AM2018-01-06T00:49:16+5:302018-01-06T00:50:21+5:30
जायखेडा : गेल्या ७० वर्षांची अखंड परंपरा असलेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडीने जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जायखेडा येथून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्तान झाले.
जायखेडा : गेल्या ७० वर्षांची अखंड परंपरा असलेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडीने ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, निवृत्तिनाथ महाराज की जय, गुरुवर्य कृष्णाजी माउली की जय’च्या जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जायखेडा येथून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे प्रस्तान झाले. टाळ-मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोषाने दिंडीमार्ग दणाणून गेला आहे.
वैकुंठवासी कृष्णाजी माउली जायखेडकर यांनी ७० वर्षांपूर्वी ही दिंडी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्ताने जायखेडा ते त्र्यंबक अशी सुरू केली. अवघ्या पाच वारकºयांना सोबत घेऊन सुरू केलेली ही पदयात्रा आता विशाल जनसागरात रूपांतरित झाली आहे. दरवर्षी अखंडपणे जायखेडा ते त्र्यंबक अशी ही पदयात्रा जाते. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दर्शनाची आस असलेले हजारो वारकरी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता या दिंडीत सामील झाले आहेत. खान्देशातील विविध भागातून आलेल्या शेकडो छोट्या-मोठ्या दिंड्या जायखेडा येथे जमा होतात. त्यानंतर दुसºया दिवशी पहाटे माउलींच्या स्मारक मंदिराला प्रदक्षिणा घालून व दर्शन घेऊन हा हजारो वारकरी भाविकांचा जत्था टाळ-मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत त्र्यंबकेश्वरकडे रवाना होतो. या दिंडीत सर्व वयोगटातील भाविक सहभागी झाले असून, महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय आहे.