मनपा हद्दीत दररोज ७०० कोरोना चाचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:46 PM2020-07-11T22:46:23+5:302020-07-12T01:56:23+5:30

कोरोना बाधिताचे कुटुंब, नातलग, निकटवर्तीय या संशयितांच्या झटपट चाचण्या करून कोरोनाच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील संशयितांच्या चाचण्यांची संख्या ७०० पर्यंत वाढविली आहे. त्यात कोविड-१९च्या नियमित ५०० चाचण्या आणि अ‍ॅँटिजेन किटच्या २०० चाचण्यांचा समावेश आहे.

700 corona test every day in municipal limits! | मनपा हद्दीत दररोज ७०० कोरोना चाचणी !

मनपा हद्दीत दररोज ७०० कोरोना चाचणी !

Next
ठळक मुद्देसंसर्गाला आळा : नियमित ५०० आणि अ‍ॅँटिजेन किटद्वारे २०० चाचण्यांचे नियोजन

नाशिक : कोरोना बाधिताचे कुटुंब, नातलग, निकटवर्तीय या संशयितांच्या झटपट चाचण्या करून कोरोनाच्या प्रसाराला वेळीच आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरातील संशयितांच्या चाचण्यांची संख्या ७०० पर्यंत वाढविली आहे. त्यात कोविड-१९च्या नियमित ५०० चाचण्या आणि अ‍ॅँटिजेन किटच्या २०० चाचण्यांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नाशिक महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, दररोज बाधितांचा आकडा दोनशेहून अधिकच्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर वृद्धांबरोबर मध्यमवयीन व्यक्तींचा मृत्यू होऊ लागला आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर कोरोना चाचण्यात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयास केले जात असून, आरोग्य प्रशासनाकडून अहवालांची संख्या तातडीने वाढवण्याचे निर्देश दिले होते. माजी मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांनीदेखील चाचण्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांनीदेखील या आठवड्यात घेतलेल्या बैठकीत चाचण्यांची संख्या वाढवून कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आदेश दिले होते.
तसेच बाधित रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्ती व संशयित वृद्ध रु ग्णांच्या चाचण्या प्रलंबित राहत असल्याने संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळेच आता नाशिक महापालिका प्रशासनाकडून दररोज कोविडच्या ५०० नियमित चाचण्या आणि २०० अ‍ॅँटिजेन याप्रमाणे ७०० चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै महिन्यातील दहा दिवसांचा रुग्णांचा व मृत्यूचा वाढता आकडा नाशिककरांसह मनपा प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनला आहे. शहरात गत दहा दिवसांत दीड हजारांहून अधिक रु ग्ण वाढले असून, पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासनाने तयार केलेले क्वारंटाइन कक्ष, कोविड केअर सेंटर व कोविड रुग्णालय यातील खाटा भरत चालल्या आहेत.

Web Title: 700 corona test every day in municipal limits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.