विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार नाशिककरांना दंडाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:58+5:302021-04-09T04:15:58+5:30

---- नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोर नियमांचे पालन ...

7,000 Nashik residents walking around without masks fined | विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार नाशिककरांना दंडाचा दणका

विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार नाशिककरांना दंडाचा दणका

googlenewsNext

----

नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोर नियमांचे पालन करण्याबाबत उदासीनता दाखविली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्चचा पंधरवडा उलटल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी तब्बल ७ हजार लोकांवर मास्क न लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच ६८ लोकांवर गुन्हे दाखल करत ४३३ व्यावसायिकांनाही दंडाचा दणका दिला आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ मध्ये पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबईनाका या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच परिमंडळ-२च्या उर्वरित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १७ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत पोलिसांनी मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. एकूण सुमारे ४६ लाखांचा दंड आतापर्यंत वसूल केला गेला आहे.

परिमंडळ-१ मध्ये त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्या ४ हजार २७ नागरिकांकडून १२ लाख ९२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून ४५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या २०५ व्यावसायिकांवर कारवाई करत २ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या १८८ व्यावसायिकांना ३ लाख ९२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. १२१ लोकांवर रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत ७४ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आणि ७२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

परिमंडळ २ मधील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना त्याचे कुठलेही गांभीर्य न बाळगता प्रशासनाच्या आदेशामधील सूचनांचे विविधप्रकारे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या २ हजार ८४३ बेफिकीर लोकांवर कारवाईचा बडगा उगारत एकूण १५ लाख ५७ हजार ६०० रुपये इतका दंड आकारण्यात आला. तसेच भादंवि कलम १८८ प्रमाणे २४ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळून आलेल्या २३ थुंकीबहाद्दर निष्काळजी वागणाऱ्यांवर कारवाई करत २४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रात्रीच्या संचारबंदीचे हेतुपुरस्सर उल्लंघन करणाऱ्या ५३ नागरिकांकडून एकूण ५२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला गेला. आतापर्यंत ८९५ नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे.

असा एकूण २५ लाख ५० हजार ३०० रुपये दंड व भादंवि कलम 188 प्रमाणे एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

.

--------इन्फो----

४१६ अस्थापनांना साडे १२ लाखांचा दंड

ज्या आस्थापनाचालकांनी आदेश व सुचनांचे उल्लंघन केले अशा परिमंडळ-१ मध्ये १८८ अस्थापनांच्या चालकांकडून ३ लाख ९२ हजारांचा दंड वसूल केला गेला. तसेच

परिमंडळ ट मधील २८८ आस्थापनावर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २०० रूपये दंड ठोठावला. प्रशासनाने निर्गमित केलेल्या विळेची मर्यादा न पाळणाऱ्या २७ आस्थापनांवर कारवाई करून १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन ८ अास्थापनांना कोरोना निर्मूलन होईपर्यंत टाळे ठोकण्यात आले.

Web Title: 7,000 Nashik residents walking around without masks fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.