विना मास्क फिरणाऱ्या 7 हजार नाशिककरांना दंडाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:24 PM2021-04-08T22:24:16+5:302021-04-09T00:31:04+5:30

नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याबाबत उदासीनता दाखविली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्चचा पंधरवडा उलटल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी तब्बल 7 हजार लोकांवर मास्क न लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच 68 लोकांवर गुन्हे दाखल करत 433 व्यवसायिकांनाही दंडाचा दणका दिला आहे.

7,000 Nashik residents without masks fined | विना मास्क फिरणाऱ्या 7 हजार नाशिककरांना दंडाचा दणका

विना मास्क फिरणाऱ्या 7 हजार नाशिककरांना दंडाचा दणका

Next
ठळक मुद्देशंभरांपेक्षा अधिक गुन्हे : 433 बेफिकीर व्यावसायिकांवरही कारवाई; 46 लाखांचा दंड वसूल

नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याबाबत उदासीनता दाखविली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्चचा पंधरवडा उलटल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी तब्बल 7 हजार लोकांवर मास्क न लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच 68 लोकांवर गुन्हे दाखल करत 433 व्यवसायिकांनाही दंडाचा दणका दिला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1मध्ये पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबईनाका या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तसेच परिमंडळ-2च्या उर्वरित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 17 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत पोलिसांनी मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. एकूण सुमारे 46 लाखांचा दंड आतापर्यंत वसूल केला गेला आहे.
परिमंडळ-1मध्ये त्यानुसार विना मास्क फिरणाऱ्या ४ हजार २७ नागरिकांकडून १२ लाख ९२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून 45 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या २०५ व्यावसायिकांवर कारवाई करत २ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या १८८ व्यावसायिकांना ३ लाख ९२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 121 लोकांवर रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत 74 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला आणि 72 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
परिमंडळ 2 मधील सर्व पोलीस ठाणे हृददीत विशेष मोहिम राबविण्यात आली होती। कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना त्याचे कुठलेही गांभीर्य न बाळगता प्रशासनाच्या आदेशामधील सुचनांचे विविधप्रकारे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या 2 हजार 843 बेफिकीर लोकांवर कारवाईचा बडगा उगारत एकूण 15 लाख 57 हजार 600 रूपये इतका दंड आकारण्यात आला. तसेच भादंवि कलम 188 प्रमाणे 24 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळून आलेल्या23 थुंकीबहाद्दर निष्काळजीपणे वागणाऱ्यांवर कारवाई करत 24 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रात्रीच्या संचारबंदीचे हेतुपुरस्सर उल्लंघन करणाऱ्या 35 नागरीकांकडून एकूण 52 हजार 500 रूपये दंड वसूल केला गेला. आतापर्यंत 895 नागरीकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे.

असा एकूण 25 लाख 50 हजार 300 रूपये दंड व भादंवि कलम 188 प्रमाणे एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

416 अस्थापनांना साडे 11लाखांचा दंड
ज्या आस्थापनाचालकांनी आदेश व सुचनांचे उल्लंघन केले अशा परिमंडळ-1 मध्ये 188 अस्थापनांच्या चालकांकडून 3 लाख 92 हजारांचा दंड वसूल केला गेला. तसेच

परिमंडळ 2मधील 228 आस्थापनावर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत 7 लाख 75 हजार 200 रूपये दंड ठोठावला. प्रशासनाने निर्गमीत केलेल्या विळेची मर्यादा न पाळणा-या 27 आस्थापनांवर कारवाई करून 1 लाख 41 हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन 8 अस्थापनांना कोरोना निर्मूलन होईपर्यंत टाळे ठोकण्यात आले.

Web Title: 7,000 Nashik residents without masks fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.