थेट इंधनातून एसटीला ७१ हजारांचा नफा

By admin | Published: October 29, 2014 12:19 AM2014-10-29T00:19:12+5:302014-10-29T00:21:17+5:30

थेट इंधनपुरवठा : एलबीटीमुळे मात्र नफ्यात घट

71,000 profits directly from FDI | थेट इंधनातून एसटीला ७१ हजारांचा नफा

थेट इंधनातून एसटीला ७१ हजारांचा नफा

Next

नाशिक : राज्य शासनाच्या निर्णयामुळे सुमारे वर्षभर खासगी पंपावर इंधन भरणाऱ्या परिवहन महामंडळाच्या पंपावर थेट इंधन आल्यानंतर मोठ्या प्रमाणात खरेदीदार असल्याचा लाभ परिवहन महामंडळाला मिळत असून, त्यामुळे महामंडळाला दैनंदिन स्वरूपात ७१ हजार रुपयांचा लाभ होतो आहे.
परिवहन महामंडळाच्या शहरात दररोज सुमारे २२५ बसेस धावतात. त्यामधून सुमारे दोन लाख २५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते. २४ तास वाहतूक होणाऱ्या या प्रवासी वाहतुकीतून महामंडळाला दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु मध्यंतरी शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फटका बसल्याने महामंडळाला थेट पुरवठा होणारे इंधन बंद झाल्याने बाहेरील पंपांवरून ते भरावे लागत असल्याने त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होऊ लागले. बाहेरील इंधनाचा दर्जाही तितकासा चांगला नसल्याने बसेसचा अ‍ॅव्हरेजही घसरला होता. त्यामुळे महामंडळाच्या नफ्यात घट होत होती. सुमारे वर्षभर हा प्रकार झाल्यानंतर अखेर राज्य शासनाने नुकतेच हे बंधन उठविल्याने महामंडळाच्या पंपावर पुन्हा थेट इंधन येऊ लागले आणि महामंडळाचा अतिरिक्त वेळ वाचला.
या इंधनाचा पुरवठा होताना तो मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यात प्रत्येक लिटरमागे सुमारे एक रुपया दहा पैसे इतकी सूट मिळू लागली. महामंडळाला दररोज सर्व बसेसमध्ये ७० हजार लिटर इंधनाची गरज भासते. ते टाकताना सुटीची रक्कम वजा होत असल्याने दररोज ७१ हजार रुपयांचा नफा महामंडळाला होतो आहे; परंतु नाशिकमध्ये स्थानिक संस्था कर असल्याने त्यातही एक रुपयापेक्षा जास्त कर महामंडळाला मनपाकडे सुपूर्द करावा लागत असल्याने अपेक्षित नफा होऊ शकत नाही. जर मनपाने महामंडळाला त्या करात सूट दिली अथवा माफी दिली तर महामंडळाच्या नफ्यात आणखी वाढ होऊ शकेल.

Web Title: 71,000 profits directly from FDI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.