ओळख न पटलेल्या मृतदेहावर रेल्वेचा ७२ तास पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:49+5:302021-02-06T04:24:49+5:30

रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द व पोलीस संख्याबळ इतर सोयीसुविधा यांचा विचार केला तर पोलिसांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. ...

72 hours watch of the train on the unidentified bodies | ओळख न पटलेल्या मृतदेहावर रेल्वेचा ७२ तास पहारा

ओळख न पटलेल्या मृतदेहावर रेल्वेचा ७२ तास पहारा

Next

रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द व पोलीस संख्याबळ इतर सोयीसुविधा यांचा विचार केला तर पोलिसांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागते. नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द लहवितपासून कसबे सुकेणापर्यंत ४२ किलोमीटरची आहे. रेल्वेस्थानक आऊटर सिग्नलच्या आत मध्ये पडलेला मृतदेहाची जबाबदारी रेल्वे पोलीस ठाण्याची असते. तर आऊटर सिग्नलच्या बाहेर पडलेल्या मृतदेहाची जबाबदारी ते ठिकाण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे त्यांची ती जबाबदारी असते.

रेल्वे समोर येऊन आत्महत्या करणारा इसम, महिला, अथवा इतर कोणी हे जास्त करून त्याच पंचक्रोशीच्या विभागातील राहत असल्याने त्या मयताची ओळख पटणे लवकर शक्य होते. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाल्यावर बहुतांश वेळेला गर्दीतूनच ओळख मिळून जाते. मयताच्या अंगावरील कपड्यांमध्ये काही कागदपत्रे, मोबाईल सापडल्यास ओळख पटवताना फारसा त्रास होत नाही. मात्र कोणी भिकारी, फिरस्ता अथवा रेल्वे प्रवास करत असताना प्रवासादरम्यान रेल्वेतून पडून मृत झाल्यास व त्या व्यक्तीच्या अंगावरील कपड्यांमध्ये काहीच नसल्यास त्याची ओळख पटवणे खूप अवघड होऊन जाते. ओळख पटलेला मृतदेह सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. मात्र ज्या मृतदेहाची ओळख पटली नाही तो मृतदेह ७२ तास रेल्वे पोलिसांना जिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवावा लागतो. त्यानंतर त्याच्यावर रेल्वे पोलिसांनाच मदत घेऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांना वृत्तपत्रातून बेवारस मृतदेहाची सर्व माहिती देऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न करावा लागतो. रेल्वेखाली सापडून मयत झालेल्या मृतदेहाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलिसांना पाच हजार रुपये दिले जातात.

--------

रेल्वेखाली आत्महत्या करणारे अनेकवेळा स्थानिकच राहणारे असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे सहज शक्य होते. सोशल मीडियामुळे मयताची ओळख पटविण्यास मोठा हातभार लागत आहे. रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेचा प्रवास करत असताना भिकारी, फिरस्ता मयत झाल्यास त्यांची ओळख सहसा मिळून येत नाही. मात्र अशावेळी रेल्वे पोलिसांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.

-विष्णू भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे

--------

२०१९ - रेल्वेच्या अपघातात मयत झालेले ७२. ओळख पटलेले ४२. अनोळखी मयत ३०.

२०२० - रेल्वेच्या अपघातात मयत झालेले ३०. ओळख पटलेले २०. अनोळखी मयत १०.

Web Title: 72 hours watch of the train on the unidentified bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.