७२ लाख वृक्षांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:49 AM2018-06-30T00:49:02+5:302018-06-30T00:49:25+5:30

वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव (कश्यपी धरणासमोरील डोंगर) येथील वनजमिनीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी (दि़ १) सकाळी ९ वाजता होणार आहे़

 72 lakh trees will be planted | ७२ लाख वृक्षांची होणार लागवड

७२ लाख वृक्षांची होणार लागवड

Next

नाशिक : वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव (कश्यपी धरणासमोरील डोंगर) येथील वनजमिनीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी (दि़ १) सकाळी ९ वाजता होणार आहे़ वनविभागाने वृक्षलागवडीसाठीची तयारी पूर्ण केली असून, खड्डे खोदण्याचे कामही पूर्ण झाले आहे. एकूण वृक्षलागवडीपैकी वनविभाग ४७ लाख ६० हजार, ग्रामपंचायत १५ लाख ८ हजार, तर इतर शासकीय यंत्रणा ९ लाख ५८ हजार वृक्षलागवड करणार असल्याची माहिती नाशिकच्या पश्चिम भाग उपवनसंरक्षक टी़ब्युला एलील मती यांनी पत्रकार परिषदेत दिली़  वृक्षलागवडीसाठी वनविभागाच्या ७० रोपवाटिकेत १ कोटी २३ लाख रोपे तयार करण्यात आली आहेत.  गतवर्षी चार कोटी वृक्षलागवड कार्यक्र मांतर्गत जिह्यात एकूण ४३ लाख ८ हजार रोपे लावण्यात आली होती. धोंडेगाव येथे होणाऱ्या वृक्षलागवडीसाठी पालकमंत्री, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार उपवनसंरक्षक टी़ब्युला एलील मती यांनी सांगितले़. हरित सेनेच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आलेल्यांना रोपांचे वाटप केले जाणार आहे.

Web Title:  72 lakh trees will be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.