७२ रुग्ण कोरोनामुक्त, ६७ ची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 01:36 AM2021-10-13T01:36:17+5:302021-10-13T01:36:59+5:30
कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत असून, मंगळवारी (दि.१२) नाशिक जिल्ह्यात कोरोना झालेले ७२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयांतून घरी गेले आहेत, तर ६७ नवीन रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे.
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत असून, मंगळवारी (दि.१२) नाशिक जिल्ह्यात कोरोना झालेले ७२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयांतून घरी गेले आहेत, तर ६७ नवीन रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३२ ग्रामीण भागातील २८ रुग्णांचा समावेश आहे. मालेगाव मनपा हद्दीत एकही रुग्ण न सापडल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, वेगवेगळ्या भागांतून आलेल्या ०७ जिल्हाबाह्य रुग्णांनी मात्र आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी एका मृत्यूची नोंद झाली असून, आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ८ हजार ६४९ पर्यंत पोहोचली आहे, तर ७७२ रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे कक्ष अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.