मधुमेह, रक्तदाबासह ७२ वर्षांच्या ढेरिंगे आजींंची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:27+5:302021-06-06T04:11:27+5:30

नाशिक : मधुमेह व रक्तदाबाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी कोरोना संसर्ग होणे म्हणजे जिवाला धोका असे समीकरण बनलेले असताना सुमन ...

72-year-old grandmother overcomes corona with diabetes and blood pressure | मधुमेह, रक्तदाबासह ७२ वर्षांच्या ढेरिंगे आजींंची कोरोनावर मात

मधुमेह, रक्तदाबासह ७२ वर्षांच्या ढेरिंगे आजींंची कोरोनावर मात

Next

नाशिक : मधुमेह व रक्तदाबाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी कोरोना संसर्ग होणे म्हणजे जिवाला धोका असे समीकरण बनलेले असताना सुमन निवृत्ती ढेरिंगे या ७२ वर्षांच्या आजींनी मधुमेहासह उच्च रक्तदाबाचाही आजार असताना कुटुंबाच्या खंबीर साथीच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे.

नाशिक रोड भागातील पळसे येथील सुमन ढेरिंगे आजींच्या दोन्ही गुडघ्यांसह डोळ्यांवरही मागच्याच वर्षात शस्त्रक्रिया झालेली असताना त्यांनी मुलगा विजय व राजू ढेरिंगे यांच्या सकारात्मक साथीने अवघ्या पाच दिवस रुग्णालयीन औषधोपचारात कोरोनावर मात केली. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना ढेरिंगे कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला आणि ढेरिंगे कुटुंबाची संपूर्ण घडीच विस्कटली. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असलेल्या सुमन ढेरिंगे यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्याच आली. यात आजींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अशा परिस्थितीत मुलगा विजय ढेरिंगे यांनी खचून न जाता या संकटातून आपण निश्चितच बाहेर पडू, असा आईला धीर देत प्रतिबंधात्मक खबरदारी घेऊन आईसोबतच राहिले. मुलगा जवळ असल्याने आईलाही धीर मिळाला, तर दुसरा मुलगा राजू ढेरिंगे रुग्णालयीन कर्मचारी असल्याने त्यांनी तत्काळ आईसाठी रुग्णालयात औषधोपचाराची सोय केली. याच संकटात सुमन ढेरिंगे यांचा मोठा मुलगा अशोक ढेरिंगे यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे ढेरिंगे कुटुंबावरील संकट वाढले. मात्र, विजय ढेरिंगे यांनी आईची साथ सोडली नाही. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या औषधोपचारामध्येच ढेरिंगे आजींनी कोरोनावर मात केली.

----

इन्फो-

कोरोना संकटातून सुखरूप बाहेर पडले कुटुंब

कुटुंबाच्या साथीने ढेरिंगे आजींनी कोरोनावर मात केली खरी; परंतु या पाच दिवसांच्या कालावधीत विजय ढेरिंगे व त्यांची पत्नी सुजाता ढेरिंगे यांनाही संसर्ग झाला. त्यामुळे त्यांनी स्वत:चे विलगीकरण केले. मात्र, त्यांचा अवघा १० वर्षांचा मुलगा ओम ढेरिंगे हा निगेटिव्ह होता. त्याला कोठे ठेवायचे असा प्रश्न निर्माण झाला. अखेर चिमुकल्या ओमने आपल्या व्यावसायिक जागेत राहण्याची तयारी दाखविली. विजय ढेरिंगे यांचे चुलत बंधू खंडू ढेरिंगे व मित्रांनी ओमकडे लक्ष दिले. १५ दिवसांच्या विलगीकरणानंतर ढेरिंगे कुुटुंब अखेर सुखरूप या संकटातून बाहेर पडले.

--

आजी हॉस्पिटलमध्ये असताना पप्पांना तिची देखभाल करावी लागत होती. त्यामुळे त्यांनाही संसर्ग झाला. या संकटात त्यांना माझी काळजी होती. म्हणून मी आमच्या व्यावसायाच्या जागेत राहिलो, खंडू काका आणि पप्पांच्या मित्रांनी माझी खूप काळजी घेतली. त्यामुळे आम्ही सर्व आता कोरोनामुक्त झालो आहोत.

-ओम ढेरिंगे, सुमन ढेरिंगे यांचा नातू

===Photopath===

050621\05nsk_16_05062021_13.jpg

===Caption===

कोरोना संकटावर मात केल्यानंतर एकत्र आलेले कुटुंहातील सदस्य विजय ढेरींगे, सुमन ढेरींगे, सुजाता ढेरींगे, ओम ढेरींगे

Web Title: 72-year-old grandmother overcomes corona with diabetes and blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.