पुणेकर महिलेचा ७२ हजारांचा ‘राणीहार’ चोरट्यांनी नाशकात लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 05:07 PM2019-04-24T17:07:17+5:302019-04-24T17:10:29+5:30

तपोवन चौफूलीवरील रस्ता ओलांडत असताना पल्सरसारख्या मोटारसायकलवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव आले व त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला साडेतीन तोळे वजनाचा सुमारे ७० हजार रूपये किंमतीचा ‘राणी हार’ ओरबाडून धूम ठोकली.

The 72-year-old 'Ranihar' thieves of the Puneer woman were involved in the destruction | पुणेकर महिलेचा ७२ हजारांचा ‘राणीहार’ चोरट्यांनी नाशकात लांबविला

पुणेकर महिलेचा ७२ हजारांचा ‘राणीहार’ चोरट्यांनी नाशकात लांबविला

Next
ठळक मुद्देचोरट्यांनी ७२ हजारांचा ऐवज लूटला शहरात वाढलेल्या जबरी चो-याही रोखण्याचे आव्हान

नाशिक : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून चोरट्यांकरिता हा हंगाम जणू पर्वणीच ठरत आहे. लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये घरफोडी असो किंवा विवाहसोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत मंगलकार्यालये, लॉन्समध्ये चोरी करण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. तपोवनात अशाच पध्दतीने दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी एका लॉन्सच्या परिसरात रस्ता ओलांडणा-या महिलेच्या गळ्यातील ‘राणीहार’ ओरबाडून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.
तपोवन चौफूलीवरील एका लॉन्समध्ये विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी स्वाती विजय परमेश्वर (३३,रा. पुणे) या वाहनातून उतरल्या व रस्ता ओलांडत असताना पल्सरसारख्या मोटारसायकलवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव आले व त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला साडेतीन तोळे वजनाचा सुमारे ७० हजार रूपये किंमतीचा ‘राणी हार’ ओरबाडून धूम ठोकली. या हारवर २ हजाराचे एकग्रॅम सोन्याचे एक गंठणही बनविलेले होते. एकूणच चोरट्यांनी जबरी लूट करत ७२ हजारांचा ऐवज लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक सदाफुले करीत आहेत.
काही दिवसांपुर्वीच गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये चक्क वधु कक्षात ठेवलेले सुमारे ५० ते ६० हजार रूपयांचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आले होते. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडको परिसरात विवाहसाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांची कुलूपे तोडून हजारो ते लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती.
ऐन निवडणूकीची धामधूम अन् लग्नसराईचा हंगाम एकाचवेळी आल्यामुळे पोलीस निवडणूक बंदोबस्तात अडकले असताना चोरट्यांसाठी मात्र लग्नसराई सुगीची ठरत असून ते नागरिकांच्या दागिण्यांवर डल्ला मारताना दिसून येत आहे. निवडणूक काळात कायदासुव्यवस्था टिकविण्यासोबत पोलिसांपुढे शहरात वाढलेल्या जबरी चो-याही रोखण्याचे आव्हान यामुळे उभे राहिले आहे.

Web Title: The 72-year-old 'Ranihar' thieves of the Puneer woman were involved in the destruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.