यंदा तब्बल ७४ विवाह मुहूर्त

By admin | Published: November 22, 2015 11:23 PM2015-11-22T23:23:21+5:302015-11-22T23:24:13+5:30

यंदा तब्बल ७४ विवाह मुहूर्त

74 marriages this year | यंदा तब्बल ७४ विवाह मुहूर्त

यंदा तब्बल ७४ विवाह मुहूर्त

Next

कनाशी : सिंहस्थ कुंभमेळा, कोकीळाव्रत, आणि अधिकमास यामुळे मुहूर्त नसल्यामुळे रखडलेल्या विवाह सोहळ्यांचा मार्ग तुलसीविवाहानंतर मोकळा होणार असून, यावर्षी तब्बल ७४ विवाह मुहूर्त आहेत़ विशेष म्हणजे यावर्षी मे महिन्यात केवळ एकच विवाह मुहूर्त असल्याचे दिसून येते़ साधारणत: तुलसीविवाहानंतर विवाहसमारंभाचा धूमधडका सुरू होणार आहे़
वधू वरांच्या लग्रघिटका जवळ येऊ लागल्या असून २३ नोव्हेबर रोजी तुळसी विवाह झाल्यानंतर यंदा विवाह मुहुर्ताचा धुमधडाका जोरात सुरू होणार आहे .चालू हंगामात एकुण ७४ मुहूर्तापैकी ४४ मुहूर्त गोरज आहेत .
यावर्षी जुलै महिन्यापर्यत विवाहाचे मुहूर्त आहेत़ विशेष म्हणजे मे महिन्यात फक्त एकच विवाह मुहूर्त आहे .तर डिसेबर मध्ये १४ ,जानेवारीत १२ ,मार्च १२ ,एिप्रलमध्ये १४. मेमध्ये १ , जुलै मध्ये ५ असे मुहूर्त आहेत .तर जून मध्ये एकही मुहूर्त नाही . यंदाच्या लग्न सराईत १३ जून २०१५ पासून विवाहाचे मुहूर्त नव्हते .यावर्षी सिहस्थ कुंभमेळा , कोकिळा व्रत , व अधिक मासामुळे विवाह मुहूर्तच नव्हते . तुळशी विवाह नंतर डिसेबर आणि फेबुवारीत सर्वाधिक १४ विवाह मुहूर्त आहेत .मे मिहन्यात लग्नाचा बँडबाजा जोरात असतो . पण त्या मिहन्यात यंदा एकच मुहूर्त आहे .(वार्ताहर)


असे आहेत मुहूर्त

नोव्हेबर - २४ , २६ ,२७ ,डिसेबर - ४ ,६ , ७ , ८ , १४, १५ ,१६ , २० ,२१ , २४ ,२५ , २९ ,३० ,३१ जानेवारी- १ , २ , ३, ४, १७ , २०, २१ ,२६ ,२८ ,२९ , ३०, ३१ , फेबुवारी- १ , २ , ३ , ४ , ५ , ११ , १३ ,१६ , १७ ,२२ ,२४ , २५ , २७, २८ मार्च- १ , ३ ,५ , ६ ,११ ,१४ ,१५ ,२० ,२१ ,२५ ,२८ ,३१ , एप्रिलम- १ ,२ ,४ ,१६ ,१७, १९ ,२२ ,२३ , २४ , २६ ,२७ ,२९ ,३० , मे मिहन्यात १ तर जुलैत ७ , १०, ११ , १२ ,१३ या तारखांना लग्राचे मुहूर्त आहेत . तसेच १३ नोव्हेबर २०१५ ते ४ एप्रिल २०१६ या कालावधीत ४२ मुहूर्त वास्तूशांतीचे आहेत .

Web Title: 74 marriages this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.