आयटीआयमध्ये दुसऱ्या फेरीअखेर ७४६ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:50 PM2018-07-25T23:50:47+5:302018-07-26T00:02:04+5:30
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरु वात झाली असून, दुसºया फेरीअखेर १३०२ पैकी अवघ्या ७४६ म्हणजेच ५७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आहे.
सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरु वात झाली असून, दुसºया फेरीअखेर १३०२ पैकी अवघ्या ७४६ म्हणजेच ५७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने गेल्या पाच वर्षांपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आली. प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर ३३९९ प्रवेश अर्ज दाखल झालेले आहेत. पहिल्या फेरीसाठी दि. ११ ते दि. १५ दरम्यान प्रवेशप्रक्रि या राबविण्यात आली होती. त्यात ५४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. प्रवेशास अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे पाहून त्यावेळी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आली होती. प्रवेशाची दुसºया फेरीसाठी दि. २० ते दि. २५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. दि. २५ जुलै अखेर ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजेच दुसºया फेरीत अवघ्या २३१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. गुरुवारी एक दिवस प्रवेशासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. यावर्षी २७ विविध व्यवसाय अभ्यासक्रम आणि ६२ तुकड्या असून, एक हजार ३०२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
बंदमुळे मुदतवाढ
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे बुधवारी बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येता आले नाही. याबाबत काही विद्यार्थ्यांनी संस्थेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तरी गुरु वारी उर्र्विरत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सुभाष कदम यांनी केले आहे.