पंचवटीत पाच वर्षांत ७५ सोनसाखळ्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 11:30 PM2021-08-29T23:30:08+5:302021-08-29T23:30:48+5:30

संदीप झिरवाळ पंचवटी : परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ पोलीस ठाणे स्वतंत्र केले ...

75 gold chain lamps in five years in Panchavati | पंचवटीत पाच वर्षांत ७५ सोनसाखळ्या लंपास

पंचवटीत पाच वर्षांत ७५ सोनसाखळ्या लंपास

Next
ठळक मुद्देसौभाग्याचे लेणे पळविले : आडगाव, म्हसरूळ शिवारात सोनसाखळी चोरट्यांची दहशत

संदीप झिरवाळ
पंचवटी : परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने पंचवटी, आडगाव तसेच म्हसरूळ पोलीस ठाणे स्वतंत्र केले असले तरी सोनसाखळी चोरट्यांनी कधी पंचवटी, तर कधी म्हसरूळ, आडगाव हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील सौभागायचे लेणे अर्थात मंगळसूत्र ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असली तरी पोलिसांना मात्र वेळेत सोनसाखळी चोर गजाआड करण्यास अपयश येत आहे. मागील पाच वर्षांमध्ये पंचवटी, म्हसरूळ व आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ७५ पेक्षा अधिक महिलांच्या सोनसाखळ्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
कधी पत्ता विचारण्याचा बहाणा, तर कधी मोकळा रस्ता बघून वृद्ध महिलांना गाठून हातोहात सोनसाखळी ओरबाडून नेल्या आहेत. सोनसाखळी ओरबाडून नेण्याच्या सर्वाधिक घटना या पंचवटी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत, तर आडगाव परिसरात लग्नसराईच्या काळात महिलांचे
दागिने चोरी झाले आहेत. पंचवटी परिसरात हिरावाडी भागात असलेल्या ओमनगर, नंदिनीनगर, बाप्पा सीताराम मार्ग रस्ता, तर सोनसाखळी चोरांना वरदानच ठरला आहे. कायम वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वृद्ध महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली आहे, तर म्हसरूळ शिवारातील कलानगर, वृंदावननगर, नागरी वसाहत परिसरात सोनसाखळी चोरांनी दहशत पसरविली आहे.
आडगावला मंगल कार्यालय, लॉन्स मोठ्या संख्येने असल्याने लग्नसराई कालावधीत सोनसाखळी चोरटे हातसफाई करतात. एकूण पाच वर्षांत जवळपास ७५ पेक्षा अधिक महिला भगिनींच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणे चोरट्यांनी लंपास केले आहे.

Web Title: 75 gold chain lamps in five years in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.