७६ गुन्हेगार सोमवारी दुपारपर्यंत राहणार शहराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:39 AM2019-04-28T00:39:05+5:302019-04-28T00:39:36+5:30
: शहरात राहून शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारुविक्रे ते, शांतता भंग करू पाहणाऱ्या एकूण ७६ संशयितांना कायदासुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने शनिवारपासून (दि.२७) शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक : शहरात राहून शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारुविक्रे ते, शांतता भंग करू पाहणाऱ्या एकूण ७६ संशयितांना कायदासुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने शनिवारपासून (दि.२७) शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ७६ संशयितांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोमवारी (दि.२९) दुपारी २ वाजेनंतर हे संशयित शहरात परत येऊ शकतात, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मतदानप्रक्रियेच्या तोंडावर शहरात कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी नांगरे-पाटील यांनी विशेष खबरदारी घेत सूक्ष्मपणे कडेकोट बंदोबस्ताची आखणी के ली आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी संशयित गुन्हेगारांविरुद्ध त्यांनी कडक कारवाई केली असून, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारूविक्री व कुठल्याहीप्रकारे शांतता भंग करू पाहणाऱ्यांना येत्या सोमवारी दुपारपर्यंत शहरात राहता येणार नाही. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा लोकांचा शोध घेऊन सुमारे ७६ संशयितांना शहरात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मागील दहा वर्षांत प्रथमच अशाप्रकारे संशयित गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले असून, त्यांचा मतदानाचा हक्कदेखील सुरक्षित ठेवण्यात आला आहे. सोमवारी दुपारपर्यंत हे ७६ संशयित शहरात येऊ शकतात व मतदानाचा हक्क बजावू शकतात, असे नांगरे-पाटील म्हणाले.
रात्री १० वाजता रेस्टॉरंट, बार होणार बंद
निवडणूक निरीक्षकांनी मागील दोन दिवसांत देशी मद्याची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत १३० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे शहरातील कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून खबरदारी घेत पोलीस आयुक्तांनी रात्री १० वाजता शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिटरूम, बार, देशी-विदेशी दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहे. हा आदेश येत्या सोमवारपर्यंत (दि.२९) रात्री १० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाºया व्यावसायिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.