एकाच दिवशी ७७० नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:26+5:302021-09-10T04:19:26+5:30
पेठ : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जोगमोडी व आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रात कोविड लसीकरणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ...
पेठ : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जोगमोडी व आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रात कोविड लसीकरणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या वेळी आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या जनजागृती अभियानामुळे गाव, पाडा, वस्तीवरील तरुण वर्गासह वयोवृद्धात लसीकरणाबाबत असलेली भीती दूर करून लसीकरण का करावे? व त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे. याची जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे एका दिवसात जास्तीत जास्त व्यक्तीने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले. याकामी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, तालुका पर्यवेक्षक बाळासाहेब चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. पाटील, डॉ. गणेश जाधव यांचेसह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कोविड लसीकरणासाठी सर्वाधिक लागणारी वेळ म्हणजे ऑनलाईन पद्धती. प्रत्येक नागरिकांचे मोबाईलद्वारे ऑनलाइन व ऑफलाईन रजिस्टर माहिती भरून घेऊन आरोग्यसेवक व सीएचओ यांनी नेटवर्कची अडचण असतानाही यावर मात करून जनजागृती व नोंदणी आदी कामे पूर्ण केली.