समृद्धी महामार्गावर होणार ७.७८ किलोमीटर बोगदा; देशातील तिसऱ्या क्रमांकाचा लांब घाटमार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 01:51 AM2020-07-25T01:51:48+5:302020-07-25T01:52:14+5:30

राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे.

7.78 km tunnel to be constructed on Samrudhi Highway; The third longest ferry in the country | समृद्धी महामार्गावर होणार ७.७८ किलोमीटर बोगदा; देशातील तिसऱ्या क्रमांकाचा लांब घाटमार्ग

समृद्धी महामार्गावर होणार ७.७८ किलोमीटर बोगदा; देशातील तिसऱ्या क्रमांकाचा लांब घाटमार्ग

Next

नाशिक : मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.७८ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा तयार होत आहे. देशातील तिसºया क्रमांकाचा सर्वात लांब बोगदा असणार आहे.

राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये नाशिकमधील समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असून, लॉकडाऊनचेसुरुवातीचे काही दिवस वगळता सातत्याने काम सुरू आहे. या महामार्गाचे १ ते १६ इतके टप्प असून, नाशिक जिल्'ातील बोगद्याचे काम असलेला हा १४ वा टप्पा आहे. याशिवाय या टप्प्यात ४० किलोमीटर लांबीचा टप्पा इगतपुरी तालुक्यातून जाणार आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये बोगदा काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. ‘एॅपकॉस’कडून सदर काम केले जात आहे. या महामार्गाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे डोंगरातून दोन मोठे बोगदे तयार करून मार्ग तयार केल जात आहे. आत्तापर्यंत सुमारे २४ टक्के या बोगद्यांचे काम झाले आहे. डाब्या बाजूने होणारा बोगदा हा ७.७८० मीटर लांबीचा तर उजव्या बाजूचा बोगदा हा ७.७४ मीटर लांबीचा असणार आहे.
देशातील सर्वांत मोठा बोगदा तामिळनाडूत आहे. चेन्नई ते नासरी दरम्यान ९ किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. तर जम्मू-काश्मीरमधील पीर पांजाल बोगद्याची लांबी ११ कि.मी. असून तो देशतील दुसºया क्रमांकाचा लांब बोगदा आहे.

स्वीर्त्झलँडमध्ये जगातील सर्वात ५७ कि.मी, लांबीचा बोगदा आहे. या बोगद्याुमळे कसारा घाट हा सात मिनिटात पार करता येईल. शिवाय मुंबईला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे. या मार्गावर दोन डोंगरांना जोडणारा पूल हा सर्वांत मोठा असणार आहे, तर दुसरा सर्वांत उंच पूलदेखील असणार आहे. नाशिकमधून जाणाºया समृद्धी महामार्गावर हे दोन्ही मोठी कामे सुरू झाली आहेत.

बोगद्याची वैशिष्ट्ये

१. बोगद्यामध्ये आपात्कालीन परिस्थिती उद््भवल्यास बोगद्यामध्ये ३०० मीटर अंतरावर २६ क्रॉस पॅसेज देण्यात आलेले आहे. या क्रॉस पॅसेजमधून दुसºया बाजूच्या बोगद्यात वाहने वळविली जाऊ शकतात.

२. १२० किलोमीटर गती देण्यात आलेल्या बोगद्यात एखाद्या वाहनात काही बिघाड झाल्यास त्यांना गाडी बाजूला लावण्यासाठी प्रत्येक७०० मी

३. बोगद्याचे उंची ९.१२ मीटर, तर रुंदी १७.६१ मीटर इतकी आहे.

Web Title: 7.78 km tunnel to be constructed on Samrudhi Highway; The third longest ferry in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.