७८ बाधित; १३२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 01:28 IST2021-10-09T01:27:50+5:302021-10-09T01:28:35+5:30
जिल्ह्यात गुरुवारी (दि. ८) एकूण ७८ रुग्ण बाधित झाले असून १३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४६ वर पोहोचली आहे.

७८ बाधित; १३२ कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ८) एकूण ७८ रुग्ण बाधित झाले असून १३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४६ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ७८ जणांची भर पडली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ४४, तर नाशिक मनपाचे ३१, मालेगाव मनपाचे १, तर जिल्हा बाह्यच्या २ रुग्णांचा त्यात समावेश आहे. मृतांमध्ये दोन्ही रुग्ण हे नाशिक मनपा क्षेत्रातील होते. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांच्या संख्येत पुन्हा भर पडून ती संख्या १२९४ वर पोहोचली आहे, तर कोरोना उपचारार्थींच्या संख्येत लक्षणीय घट येऊन ती संख्या ८४१ वर आली आहे.