नाशिक विभागात ७८ टक्के रुग्ण बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:03 AM2020-09-15T02:03:17+5:302020-09-15T02:03:38+5:30
नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत सध्या १ लाख ३६ हजार रुग्ण आढळले असले तरी १ लाख ६ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७८.२५ टक्के इतके आहे, तर मृत्युदर २.१२ टक्के इतका आहे.
नाशिक : नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत सध्या १ लाख ३६ हजार रुग्ण आढळले असले तरी १ लाख ६ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७८.२५ टक्के इतके आहे, तर मृत्युदर २.१२ टक्के इतका आहे.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या नाशिक विभागात वाढत आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा वेगाने उपाययोजना करीत आहेत.
नाशिक जिल्हा हॉटस्पॉट
नाशिक विभागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के इतके आहे. जिल्ह्यात १ हजार ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये ९७१, धुळे जिल्ह्यात ३२१, नंदुरबार ९६ तर अहमदनगरमध्ये ४३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.विभागात सर्वाधिक ५२ हजार ३२९ रुग्ण आढळले, त्यातील ४० हजार ८६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात ३८ हजार १७१ रुग्ण आढळले असून, त्यातील २७ हजार २११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. धुळे जिल्ह्यात ११ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून, त्यातील ९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.
नाशिक विभागात ३३ हजार २५७ रुग्ण गृहविलगीकरणात, तर ६ हजार १३८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेत आहेत. नंदुरबारमध्ये चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले असले तरी २ हजार ८३९ रुग्ण बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ३१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातील २६ हजार १५६ रुग्ण बरे झाले आहेत.