जिल्ह्यात अकरावीच्या ७८ हजार ८०० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:47 AM2018-06-04T01:47:41+5:302018-06-04T01:47:41+5:30

नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, यावर्षी नाशिक जिल्ह्णात अकरावी प्रवेशासाठी तीन नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. तसेच पाच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे दीड हजाराहून अधिक जागा वाढल्या आहेत. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरासह जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयांत कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त शाखा यांच्या तब्बल ७८ हजार ८०० जागा उपलब्ध होणार असून, यात शहरातील विविध ५७ महाविद्यालयांमध्ये २७ हजार जागा उपलब्ध होणार आहेत.

78 thousand 800 seats in the district | जिल्ह्यात अकरावीच्या ७८ हजार ८०० जागा

जिल्ह्यात अकरावीच्या ७८ हजार ८०० जागा

Next
ठळक मुद्देदीड हजाराहून अधिक जागा वाढणार : नवीन महाविद्यालयांसह तुकड्यांनाही मंजुरी

नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, यावर्षी नाशिक जिल्ह्णात अकरावी प्रवेशासाठी तीन नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे. तसेच पाच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वाढीव तुकड्यांनाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सुमारे दीड हजाराहून अधिक जागा वाढल्या आहेत. दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरासह जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयांत कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त शाखा यांच्या तब्बल ७८ हजार ८०० जागा उपलब्ध होणार असून, यात शहरातील विविध ५७ महाविद्यालयांमध्ये २७ हजार जागा उपलब्ध होणार आहेत.
नाशिकमध्ये यंदा देवळाली विभागातील तीन महाविद्यालये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षी शहरातील महापालिका हद्दीतील ५७ महाविद्यालयांत आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या होणार असून, त्यासाठी एकूण २७ हजार जागा उपलब्ध आहेत, तर जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची आॅफलाइन प्रवेशप्रक्रि या होणार असून, ५१ हजार ८०० जागा उपलब्ध असतील. नाशिक शहरात उन्नती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, संदीप फाउंडेशन ज्युनिअर कॉलेज, अ‍ॅम्ब्रो ज्युनिअर कॉलेज या वर्षापासून सुरू होणार आहेत. पाच कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकड्या घेतल्या आहेत, तर दहा महाविद्यालयांनीही वाढीव तुकड्यांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्हाभरातील अकरावीच्या जागांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नाशिक शहरातील महाविद्यालयनिहाय जागा
नाशिकरोड बिटको महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित ३६० व कायम विनाअनुदानितमध्ये २४० जागा उपलब्ध आहेत. तर कला शाखेच्या अनुदानित २४० जागा असून वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित २४० व कायम विनाअनुदानित १२० व मराठी माध्यमाच्या अनुदानित १२० जागा आहेत. तर एमसीव्हीसी शाखेत मराठी माध्यमाच्या अनुदानित ४५ जागा आहेत.
च् भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या अनुदानित २४० व विनाअनुदानित १२० जागा असून कला शाखेच्या मराठी माध्यमात अनुदानित २४० व इंग्रजी माध्यमात अनुदानित १२० व मराठी माध्यमात १२० जागा आहेत.
च् सीएमसीएस कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत सेल्फ फायनान्सच्या २४० जागा असून, वाणिज्य शाखेतील इंग्रजी माध्यमात सेल्फ फायनान्सच्या १२० जागा आहे.
च् जी. डी. सावंत कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत सेल्फ फायनान्सच्या इंग्रजी माध्यमातील १२० जागा व विनाअनुदानितच्या २४० जागा असून, कला शाखेत विनाअनुदानित १२० जागा व वाणिज्य शाखेच्या विनाअनुदानित १२० जागा आहेत.
च्आरवायके सायन्स महाविद्यालयात अनुदानित ६०० जागा असून, विनाअनुदानितच्या २४० जागा आहेत. एचपीटी आर्ट महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या अनुदानित ३६० जागा आहेत. बीवायके कॉमर्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमातील अनुदानित ७२० व विनाअनुदानित २४० जागा आहेत. तर एमसीव्हीसी शाखेत २४० जागा आहेत. तर एचपीटी आर्ट अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयात एमसीव्हीसी शाखेत मराठी माध्यमाच्या १२० जागा आहेत.
च् केएसकेडब्ल्यू सिडको महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित १२० जागा व विनाअनुदानितच्या ३६० जागा असून, कला शाखेत मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित २४० जागा व वाणिज्य शाखेच्या विनाअनुदानित ४८० जागा आहेत.
च् केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत अनुदानित १२०० जागा आहेत. सेल्फ फायनान्सच्या २४० व विनाअनुदानितच्या १२० जागा असून, कला शाखेत मराठी माध्यमाच्या अनुदानित ७२० जागा व वाणिज्य शाखेत इंंग्रजी माध्यमाच्या अनुदानित ६००, मराठी माध्यमाच्या अनुदानित ४८० व विनाअनुदानित १२० जागा आहेत. तर एमसीव्हीसी शाखेत मराठी माध्यमाच्या अनुदानित १५० जागा आहेत.
च् केव्हीएन महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत सेल्फ फायनान्सच्या १२० जागा असून, विनाअनुदानितच्या ३६० जागा आहेत. कला शाखेच्या मराठी माध्यमातील विनाअनुदानित १२० जागा आहेत. वाणिज्य शाखेत मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित ३६० जागा आहेत.
च् लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित २४० जागा आहेत. तर सेल्फ फायनान्सच्या १२० व विनाअनुदानितच्या १२० जागा असून, कला शाखेत मराठी माध्यमाच्या अनुदानित ३६० जागा आहेत. वाणिज्य शाखेत मराठी माध्यमाच्या अनुदानित २४० जागा आहेत. तर एमसीव्हीसी शाखेत मराठी माध्यमाच्या अनुदानित १७० जागा आहेत.
च् एसएमआरकेत विज्ञान शाखेच्या कायम विनाअनुदानित १२० जागा असून, कला शाखेच्या मराठी माध्यमातील अनुदानित १२० जागा आहेत. वाणिज्य शाखेत कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या ६० व मराठी माध्यमाच्या ६० जागा असून, एमसीव्हीसी शाखेत मराठी माध्यमाच्या अनुदानित ८० जागा आहेत.

Web Title: 78 thousand 800 seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.