८४ जागांसाठी ७८० उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: May 7, 2017 01:50 AM2017-05-07T01:50:55+5:302017-05-07T01:51:03+5:30
ंमालेगाव : महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७८० उमेदवारी अर्ज
दाखल झाले आहेत. सर्वाधिक उमेदवारी अर्ज शहराच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक
१, २, ८, ९, १०, ११ मधून दाखल झाले आहेत. महानगरपालिकेची निवडणूक येत्या
२४ मे रोजी होत आहे. गेल्या २९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. (पान ५ वर)
मात्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब केला होता. शनिवारी अखेरच्या दिवशी ४४४ विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारपर्यंत ३३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ८४ जागांसाठी एकूण ७८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ कार्यालयात शनिवारी दिवसभरात ९८, तर एकूण १७१ अर्ज दाखल झाले आहेत. कार्यालय- २ मध्ये दिवसभरात ८२, तर एकूण १७४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. कार्यालय क्रमांक- ३ मध्ये ४८ असे एकूण ७९, कार्यालय क्रमांक- ४ मध्ये ५६ एकूण १०१, कार्यालय क्रमांक- ५ मध्ये ५८ एकूण ८२, कार्यालय क्रमांक - ६ मध्ये ४८ एकूण ९१, कार्यालय क्रमांक- ७ मध्ये ५४ एकूण ८२ अर्ज दाखल झाले आहेत.