अंगणवाडी सेविकेच्या ९ जागांसाठी ७९ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:01+5:302021-07-18T04:12:01+5:30
कोरोना रोगामुळे पद भरती प्रक्रिया शासन स्तरावर २०१९ पासून रखडली होती. शासनाने तत्काळ अंगणवाडी सेविका ...
कोरोना रोगामुळे पद भरती प्रक्रिया शासन स्तरावर २०१९ पासून रखडली होती. शासनाने तत्काळ अंगणवाडी सेविका व मदतनीस ही मानधनी पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. अर्ज दाखल करण्यासाठी १६ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानुसार दिंंडोरी-१ अंगणवाडी सेविका एकूण रिक्त पद संख्या ३ साठी २४ अर्ज दाखल तर मदतनीस रिक्त पद संख्या ९ साठी ४३ अर्ज दाखल झाले आहेत. दिंडोरी उमराळे-२ अंगणवाडी सेविका एकूण रिक्त पद संख्या ६ साठी ५५ अर्ज दाखल तर मदतनीस रिक्त पद संख्या ११ साठी ४३ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी रमेश बनकर यांनी दिली आहे. सदर भरती प्रक्रिया दरम्यान मदतनीस या पदाकरिता शैक्षणिक पात्रता इयत्ता ७ वी ठेवली होती; परंतु २००९ नंतर श्रेणी गुण पद्धत आली, या गुण पद्धतीमुळे या भरती प्रक्रियेत अर्जदाराची गुणपत्रक जारी करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली होती.