७९ कर्मचाऱ्यांना सहायक  लिपिकाची पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:43 PM2018-12-18T23:43:20+5:302018-12-19T00:34:17+5:30

जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाºयांना कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली.

 79 Employees Promotional Assistant Writer | ७९ कर्मचाऱ्यांना सहायक  लिपिकाची पदोन्नती

७९ कर्मचाऱ्यांना सहायक  लिपिकाची पदोन्नती

Next

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाºयांना कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली.  जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांना परिचर (गट ड) संवर्गातून कनिष्ठ सहायक लिपिक (गट क) संवर्गात पदोन्नती देण्यात येते. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील पत्रानुसार सदरची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी प्रशासन विभागाने १६२ पात्र कर्मचाºयांची यादी तयार केली होती. या कर्मचाºयांना समुपदेशानासाठी बोलावण्यात आले होते. यातील ११ कर्मचारी अपात्र तर ७२ कर्मचाºयांनी पदोन्नतीस नकार दिल्याने उर्वरित ७९ जणांना पदोन्नती देण्यात आली. यावेळी उमेदवारांना उपलब्ध जागांची माहिती देण्यात येऊन त्यातील तीन जागांचा प्राधान्यक्रम देण्यात
आला. तीन पर्यायांप्रमाणे उपलब्ध पर्यायातून कर्मचाºयांना पदोन्नती देण्यात आली. त्याचप्रमाणे समुपदेशन झाल्यावर तत्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधीकिरण सोनकांबळे तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  79 Employees Promotional Assistant Writer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.