परिवार फाउंडेशनमार्फत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:58 PM2020-12-30T16:58:01+5:302020-12-30T16:59:12+5:30
सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परिवार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले, नाशिक जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा जिल्ह्यात तीनही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजधुरिना दिला जातो. या पुरस्काराचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परिवार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले, नाशिक जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा जिल्ह्यात तीनही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजधुरिना दिला जातो. या पुरस्काराचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले होते, व्यासपीठावर नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण वाजे, मविप्र संचालक सचिन पिंगळे, प्रणव पवार, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक उद्दव निमसे, नाशिक अर्बन बँक चेअरमन शिवाजी तडाखे, प्रभाकर रायते, विष्णूपंत गायखे, शांताराम भागवत उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रात दिला जाणारा परिवार भुषण पुरस्कार गोदाकाठ भागात सलग २३ वर्ष रक्तदान शिबीराचे आयोजन करुन हजारो रुग्णांना जीवनदान देणारे डॉ प्रल्हाद डेर्ले यांना प्रदान करण्यात आला. डॉ. डेर्ले यांनी कोरोना काळात एकही दिवस सेवा बंद केली नाही जवळपास सातशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरे केले, परिसरात दरवर्षी हजारो झाडांचे वाटप करून संगोपन करतात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला,
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यात अवयव दानाची चळवळ उभी करुन अनेक कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने अवयव दान करण्यासाठी प्रवृत्त करतात, रस्त्यावरील भिकारी, वेडे यांना जेवण देणे त्यांना आंघोळ घालून त्यांचे केस कापणे, त्यांच्यावर इलाज करणे असे मानवतावादी कार्य भावे करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आला, तर कृषी क्षेत्रात राज्यात सेंद्रिय शेतीचा पॅटर्न राबविण्यात अग्रेसर असणारे माणिकराव कासार यांना प्रधान करण्यात आला.
यावेळी परिवार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, महाराष्ट्र माझा परिवाराचे अध्यक्ष धोंडीराम रायते, बाजीराव कमानकर, मनोज ठाकरे, राजाराम मुंगसे, सुदाम खालकर, स्वप्नील डुंबरे, सचिन उगले, रुपचंद ढिकले, अशोक डमाळे, दीपक पाटील, शिवाजी हांडोरे, शिवनाथ कापडी, राहुल कोटकर, सौरभ बैरागी, धनंजय राजोळे, अनिल टर्ले, संजय जाधव, संतोष गायधनी, योगेश रायते, सोमनाथ आढाव, निखिल डेर्ले, गणेश वाणी, विक्रम निरगुडे, संतोष वरखडे, शरद कदम, उत्तम देवकर, गोविंद झोमान, वाळू जाधव, विनोद खेलूकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक विकास भागवत यांनी तर सूत्रसंचालन जावेद शेख यांनी केले.