नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

By संजय पाठक | Published: October 9, 2022 09:57 AM2022-10-09T09:57:26+5:302022-10-09T09:58:16+5:30

नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली. 

8 dead in Nashik accident identified, bodies of three in custody of relatives | नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

नाशिक अपघातातील 8 मृतांची ओळख पटली, तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

Next

संजय पाठक

नाशिक - यवतमाळ येथून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईला निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या विनावातानुकूलित स्लीपर लक्झरी बसला नाशिक शहरातील तपोवनाजवळ शनिवारी पहाटे पाच वाजता भीषण अपघात झाला. शहरातील औरंगाबाद मार्गावर झालेल्या या बस अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यातील आठ जणांची ओळख पटली असून तीन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली. 

वाशीम मधील उद्धव भिलंग, वैभव भिलंग, साहिल चंद्रशेखर, अशोक बनसोड, ब्राम्हदत्त मनवर हे पाच जण, बुलडाणा येथील कल्याणी मुधोळकर, पार्वती मुधोळकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शंकर कुचनकर यांची ओळख पटली आहे. काल पहाटे नाशिक शहरातील औरंगाबाद मार्गावर यवतमाळ- मुंबई या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसची आयशर ट्रकशी धडक झाली आणि त्यानंतर बसला आग लागली होती. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 43 प्रवासी जखमी झाले होते.

मृतांच्या नातेवाइकांना ७ लाख 

मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये तर गंभीर जखमींना दाेन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये जखमींना भेट दिल्यानंतर केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमींना पूर्ण उपचार केले जातील, कोणतीही काळजी करू नका, असे सांगत दिलासा दिला. केंद्राकडूनही मृतांच्या कुटुंबीयांना दाेन लाख तर गंभीर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे. 

बसची धडक बसल्यानंतर ट्रकचा डिझेल टँक फुटला. त्यानंतर भीषण आग लागली. घटनेची माहिती पोलीस, अग्निशमन दलाला तब्बल अर्ध्या तासाने मिळाली. शहराच्या अगदी जवळ झालेल्या या अपघातावेळी आपत्कालीन मदत उशिराने पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 
 

Web Title: 8 dead in Nashik accident identified, bodies of three in custody of relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.