३६ लाखांच्या वाहनांसह ८ लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:23 AM2018-06-10T00:23:33+5:302018-06-10T00:23:33+5:30

8 lakh liquor was seized with 36 lakh vehicles | ३६ लाखांच्या वाहनांसह ८ लाखांचे मद्य जप्त

३६ लाखांच्या वाहनांसह ८ लाखांचे मद्य जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देसात लाख ९५ हजार ४२८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत

पेठ : गुजरातमधून महाराष्ट्रात अवैध मार्गाने तीन आलिशान वाहनांतून विविध कंपन्यांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन दोन हजार ८५० मद्याच्या बाटल्यांची रात्री उशिरा मोजणी करण्यात आली. यामध्ये सात लाख ९५ हजार ४२८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शुक्र वारी पेठ पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून तस्करांनी सोडून दिलेली वाहने ट्रॅक्टरला जोडून पोलीस ठाण्यात आणली. मात्र दारु वर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वतंत्रपणे निर्माण केलेला असतानाच ज्या ठिकाणी वादग्रस्त वाहनांची कोंडी करण्यात तेथुन करंजाळी येथील दिंडोरी उपविभागाचे अखत्यारीतील राज्य उत्पादन शुल्क विभागास याची खबरच नव्हती ? मात्र पोलीसांनी कळवुनही त्यातील कुणीही अधिकारी, कर्मचारी तिकडे फिरकलेच नाहीत . पेठ पोलीस ठाण्यात गुजरातमधून महाराष्ट्रात गाडयांमधून विदेशी दारु महाराष्ट्रात पेठ मार्गाने येणार असल्याची खबर प्राप्त झाली . मात्र ऐनवेळी मार्ग बदलून ओझरखेड , हरसुल ,कोहोर , करंजाळी मार्गाने वाहने घुसवि ण्यात आली . ही खबर मिळाल्याने करंजाळी येथे आठवडा बाजार असल्याने तस्कर गर्दीचा फायदा घेऊन पलायन करीत असल्याने पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी करंजाळी -कोहोर मार्गादरम्यान वाहनांची कोंडी करण्याचा निर्णय घेतला .त्यासाठी कौहार, भायगाव , लिंगवणे व परिसरातील पोलीस मित्रांच्या सहकार्याने दुपारी 4 वाजे दरम्यान करंजाळीच्या दिशेने येत असतांना आपण घेरले गेलो याची खात्री झाल्याने तस्कर वाहने लॉक करूण पळून जाण्यात यशस्वी झाली .या या धडक कारवाईची माहिती पोलीस अधिक्षक संजय दराडे , अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड व पोलीस उप अधिक्षक शामराव वळवी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी सहायक पोलीस निरिक्षक साळी , पोलीस हवालदार डंबाळे, जाधव .डिंगर , शेखरे पोलीस नाईक रहेरे , भुसनर, तुंगार पोकॉ . भोये पोलीस नाईक
फलाने यांच्या पथकाने गेली कित्येक वर्षात अश्या प्रकारची धाडसी कारवाई केली.
या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी . कायदा अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . मात्र या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे कठीण आव्हान पोलीस खात्यापुढे असुन नाशिकिस्थत काही राजकीय पदाधिकारी प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याने विदेशी दारु ची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता दिसुन येते .वाहनांची तपासणी केली असता त्यात खच्चून विदेशी दारूच्या बाटल्या , खोके भरलेले आढळून आले . चालक वाहनांच्या चाव्या घेऊन गेलेले आढळून आल्याने परिसरातील ट्रॅक्टरला जोडून वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली . मालाचे वर्गीकरण करण्यात आले असता . त्यात दमन निर्मीत दारूच्या बाटल्या आढळून आल्या . त्याची बाजारभावाने किंमत सात लाख ९५ हजार ४२८ रु पये एवढी असून, ३६ लाखांच्या वाहनांसह ४३ लाख ९५ हजार ४२८ रु पयांचा माल जप्त करण्यात आला .

Web Title: 8 lakh liquor was seized with 36 lakh vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक