नाशिकरोडला मोबाइल डिलिव्हरीतून आठ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:13 PM2018-08-20T17:13:41+5:302018-08-20T17:17:01+5:30
नाशिकरोड : मोबाइल दुकानात काम करणाऱ्या संशयिताने मोबाइलची डिलिव्हरी परस्पर दुस-या ठिकाणी पाठवून आठ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना नाशिकरोडच्या जय भवानीरोडवरील न्यूज सिंग एजन्सीमध्ये घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी दुकानातील कामगार संशयित मंगेश तानाजी गायखे (३०, रा. साई लोट्स अपार्टमेंट, खर्जुल मळा) यास अटक केली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीतील रहिवासी जयप्रितसिंग लांबा यांचे जय भवानी रोडवर मोबाइल दुकान आहे़ या दुकानात कामास असलेल्या मंगेश गायखे याने दि. ३ आॅगस्ट २०१८ रोजी सॅमसंग कंपनीचे १३० मोबाइलची वणी व दिंडोरी या ठिकाणी डिलिव्हरी देण्याऐवज परस्पर मुंबई येथील वितरकाकडे फिरविली़ यामुळे वणी व दिंडोरी येथील ज्या मोबाइल दुकानाच्या मालकांनी सिंग यांच्या एजन्सीकडे मोबाइलची रक्कम जमा करूनही त्यांना मोबाइल मिळालेच नाहीत.
हा प्रकार दुकानमालक लांबा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संशयित गायखेविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीनुसार गायखे याने सात लाख ८१ हजार ३०० रुपये किमतीचे १३० मोबाइल परस्पर दुस-या ठिकाणी पाठवून सिंग यांची फसवूणक केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़