खात्यातून परस्पर ८० हजार लांबविले
By Admin | Published: May 20, 2017 11:34 PM2017-05-20T23:34:20+5:302017-05-20T23:37:24+5:30
खात्यातून परस्पर ८० हजार लांबविले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंदरसूल : येथील ज्ञानेश्वर हिरामण तुपसैंदार यांना भ्रमणध्वनीवरून बॅँक खाते क्रमांक, एटीएम पासवर्ड अशी माहिती विचारत बँक आॅफ बडोद्यातील ११७१०१००००८५५४ क्रमांकाच्या खात्यातून परस्पर ८० हजार रुपये काढून घेत अज्ञात इसमाने फसवणूक केली आहे.
येथील ज्ञानेश्वर हिरामण तुपसैंदार यांना अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीवरून खात्याची चौकशी खात्यातून परस्पर ८० हजार रुपये काढून घेत. तब्बल एकापाठोपाठ एक असे नऊवेळा सदर रक्कम इतर ठिकाणी वर्ग केल्याचा संदेश तुपसैंदार यांना प्राप्त झाला असता त्यांनी त्वरित बँकेशी संपर्क साधला व चौकशी केली असता शाखाधिकारी राहुल शेळके यांनी बँकेतून अशा प्रकारची माहिती कधीही विचारली जात नसल्याचे सांगितले. या नंतर खातेदार तुपसैंदार यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस निरीक्षक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला आहे.
अहोरात्र मोलमजुरी करून काटकसरीने बँकेत पैसे जमा केले. मात्र ८० हजार रु पये खात्यातून गायब झाल्याने त्वरित चौकशी करावी, अशी मागणी खातेदार ज्ञानेश्वर तुपसैंदार यांनी केली आहे. या प्रकारामुळे अंदरसूल गावात खळबळ उडाली आहे. यापूर्वी या बँकेची इंटरनेट सेवा ठप्प होती. एटीएममध्ये पैशाचा तुटवडा होता. अशात हा प्रकार घडला आहे. यापूर्वी बागुल या आडगावरेपाळ येथील शेतकऱ्याची रक्कम परस्पर अशीच काढली गेली होती. संबंधिताचा फोन नंबर व पूरक माहिती देऊनही अद्यापपावेतो तपास लागलेला नाही. यासह एकाही सायबर गुन्ह्याचा शोध येवला शहर अथवा तालुकाद्वारा लागला नसल्याची माहिती आहे.
तक्रारीने केवळ कागद काळा होतो. परंतु तपास लागत नसल्याचा अनुभव आहे.