८० टक्के युवकांनी घरकामात केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:56 PM2020-05-10T22:56:59+5:302020-05-10T22:58:05+5:30
नाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौशल्ये आत्मसात केली आहेत.
लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सर्वांनाच घरी बसावे लागत आहे. यासंदर्भात नाशिकमधील युवकांना काय वाटते, त्यांचा वेळ कसा गेला, त्यांनी या कालावधीकडे कसे बघितले याविषयी एचपीटी महाविद्यालयातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी प्राजक्ता नागपुरे हिच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण करून लॉकडाउनविषयी युवकांची मते जाणून घेतली. प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. वृंदा भार्गवे व प्रा. रमेश शेजवळ यांनी त्यांना मार्गदर्शन केले. लॉकडाउन करण्याची गरज होती किंवा नाही याबाबत सध्या राजकीय आरोप सुरू झाले असले तरी ९५ टक्के युवकांनी त्याचे समर्थन केले. मात्र आता लॉकडाउन संपवावाच असे मत ७५ टक्के जणांचे मत आहे. लॉकडाउनमुळे बेरोजगारी वाढले असे ७४ टक्के जण सहमत आहे. मात्र, त्यातून भारत सावरेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. ५२ टक्के युवकांनी या कालावधीत विविध कौशल्ये आत्मसात केली आहेत. खासगी आयुष्य जपता येत नाहीघरातच कुटुंबासमवेत असल्याने खासगी आयुष्य जपता येत नाही असे १८ टक्के युवकांचे मत असल्याचे सर्वेक्षणात आढळले, तर २९ टक्के युवकांना काही प्रमाणात खासगीपण जपता येत नाही असे वाटते.जीवनाचा खरा अर्थ कळालालॉकडाऊनच्या काळात जीवनाचा खरा अर्थ कळाला असे मत ७३ टक्के जणांनी व्यक्त केले आहे. ९७ टक्के युवकांनी आरोग्य सजग होताना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कोरोनामुळे आता काही खरं नाही अशी भीती २५ टक्के युवक-युवतींनी व्यक्त केली.