जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांनी उतरविला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:31+5:302021-07-18T04:11:31+5:30

चौकट- तालुकानिहाय पीकविमा घेतलेले शेतकरी संख्या बागलाण - ७४६९ , चांदवड - ९१०६, देवळा - ५०५४ , दिंडोरी- १५०, ...

80,000 farmers in the district took out crop insurance | जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांनी उतरविला पीकविमा

जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांनी उतरविला पीकविमा

googlenewsNext

चौकट-

तालुकानिहाय पीकविमा घेतलेले शेतकरी संख्या

बागलाण - ७४६९ , चांदवड - ९१०६, देवळा - ५०५४ , दिंडोरी- १५०, नाशिक - ६९५, नांदगाव - १०३१० , मालेगाव - १८३२४, कळवण - १०६८, पेठ - ५५६४, त्र्यंबकेश्वर - १९४६, इगतपुरी - ८९७०, येवला - १७००, सिन्नर - २७७३, सुरगाणा - ३५५०, निफाड - ३४५२

चौकट-

अर्ली द्राक्षांचाही समावेश

यावर्षी हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेत अर्ली द्राक्षंचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला असला तरी यासाठी द्राक्ष उत्पादकांना तब्बल ६४ हजार रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणे कठीण असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे.

चौकट-

पीकनिहाय संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता

पीक संरक्षित रक्कम हप्ता

भात ४५००० ९००

ज्वारी २५००० ५००

बाजरी २२००० ४४०

भुईमुंग ३५००० ७००

सोयाबीन ४५००० ९००

कापूस ४५००० २२५०

मका ३०००० ६००

कांदा ६५००० ३२५०

चौकट-

विमा कंपन्याच होतात मालामाल

खरीप हंगामाच्या काळात कृषी विभागाच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याचे आवाहन करण्यात येते शेतकरीही मोठ्या अपेक्षेने अडीअडचणी काढून पीकविम्याचे पैसे भरतात, पण ज्यावेळी प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची वेळ येते त्यावेळी कंपन्या नियमांवर बोट ठेवतात यामुळे अगदी अल्प शेतकऱ्यांनी पीकविम्याची रक्कम मिळत असल्याची अनेक उदाहरण जिल्ह्यात आहेत.

Web Title: 80,000 farmers in the district took out crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.