परराज्यात ८० हजार टन कांदा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:50 AM2019-01-05T00:50:01+5:302019-01-05T00:50:19+5:30

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाड व खेरवाडी येथून महिन्याभरात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात रेल्वेच्या ५१ रेकमधून सुमारे ८० हजारहून अधिक टन कांदा पाठविण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

80,000 tonnes of onion in the state leave | परराज्यात ८० हजार टन कांदा रवाना

परराज्यात ८० हजार टन कांदा रवाना

Next
ठळक मुद्देमागणी वाढली : मध्य रेल्वेला कोट्यवधींचे उत्पन्न

मनोज मालपाणी। नाशिकरोड : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, निफाड व खेरवाडी येथून महिन्याभरात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात रेल्वेच्या ५१ रेकमधून सुमारे ८० हजारहून अधिक टन कांदा पाठविण्यात आला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कांद्याची मागणी वाढल्याने दरदेखील वाढले आहे. यामुळे जानेवारी महिन्यात कमी प्रमाणात कांदा पाठविण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. नगदी पीक असलेला जिल्ह्यातील कांदा रेल्वे, रस्ता मार्गे विविध राज्यात पाठविला जातो. त्या राज्यातून जवळच्या इतर देशातदेखील कांदा पाठविला जातो. मध्य रेल्वेच्या नाशिक विभागातून निफाड व खेरवाडी तसेच मनमाड विभागातील मनमाड व लासलगाव येथून कांद्याचे रेक भरून पाठविले जातात.
८० हजार टन कांदा पाठविला
लासलगाव येथून डिसेंबर महिन्यात रेल्वेच्या ११ रेक (३९२ वॅगन), मनमाड येथून १६ रेक (६५६ वॅगन), निफाड येथून १२ रेक (४७० वॅगन) व खेरवाडी येथून ७ रेक (३०० वॅगन) कांदा पाठविण्यात आला. व्यापाऱ्यांकडे भरपूर प्रमाणात कांद्याचा स्टॉक असल्याने व कांद्याचे भावदेखील कमी प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा विविध राज्यात पाठविण्यात आला. मात्र कांद्याची मागणी वाढल्याने भावदेखील वाढले. तसेच व्यापाºयांकडे कांद्याचा साठा जास्त नसल्याने डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत कांदा कमी प्रमाणात पाठविण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यात लासलगावहून १ रेक (४२ वॅगन), मनमाड २ रेक (८४ वॅगन), निफाड १ रेक (२८ वॅगन), खेरवाडी येथुन १ रेक (४२ वॅगन) भरून कांदा पाठविण्यात आला आहे. रेल्वेने बिहार पाटणाजवळील फतवा, पश्चिम बंगालमधील चितपूर, आसाममधील चांगसरी डांकुनी, पश्चिम बंगालमधील राणीपात्रा, उत्तर प्रदेश या ठिकाणी डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकूण ५१ रेक (२०१४ वॅगन) मधून सुमारे ८० हजारहून अधिक टन कांदा पाठविण्यात आला आहे. रेल्वेने गेलेला कांदा रस्ता वाहतुकीद्वारे त्या राज्याच्या विविध भागात शिवाय बिहारपासून जवळच असलेल्या नेपाळ व पश्चिम बंगालपासून जवळच असलेल्या बांगला देशमध्ये देखील पाठविण्यात येतो.
५१ रेकमधून वाहतूक
डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत
लासलगाव, मनमाड, निफाड, खेरवाडी येथून विविध राज्यात रेल्वेच्या ५१ रेकमधून पाठविण्यात आलेल्या कांद्याच्या वाहतुकीतून १७ कोटी ४० लाखाचे उत्पन्न रेल्वे प्रशासनाला मिळाले आहे.

Web Title: 80,000 tonnes of onion in the state leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.