इगतपुरी तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी ८३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:53 AM2019-03-25T00:53:54+5:302019-03-25T00:54:12+5:30
इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदानप्रक्रि या शांततेत पार पडली. दुपारच्या उन्हाचा मतदान प्रक्रि येवर परिणाम जाणवला. सायंकाळपर्यंत सुमारे ८३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अखेरच्या वेळेपर्यंत हक्काचे मतदान करवून घेण्यासाठी उमेदवारांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते.
मतदानासाठी मतदारांनी बाहेर पडावे यासाठी चारचाकी वाहनांची खास व्यवस्था करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. २७ ग्रामपंचायती ंमध्ये प्रत्यक्षात मतदान प्रक्रि या पार पडली. दुपारच्या उन्हात मतदान करणे अवघड होईल याचा अंदाज असल्याने मतदारांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली होती. गावातील अनेक मतदार उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेलेले आहेत. अशा मतदारांना शोधण्यात उमेदवारांच्या समर्थकांनी कोणतीही कसर सोडली नाही. मतदानाच्या दिवशी दिवसभर अनेक घडामोडी घडत असल्यातरी या संदर्भात कोणत्याही तक्र ारी आल्या नाही. मतदारांनी शांततेत मतदान केल्याने इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी आभार व्यक्त केले. तालुक्यातील ७७ केंद्रावर जवळपास ४६० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाची जबाबदारी पार पाडली. मतदान प्रक्रि या शांततेत पार पडावी यासाठी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, वाडीवºहेचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शन ाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मतदानावेळी काही केंद्रांवर उमेदवारांनी काही मुद्द्यांवर आक्षेपही घेतले. काही कारणांवरून किरकोळ वादही उद्भवले. दुपारच्या वेळी मतदान प्रक्रि या संथपणे सुरू होती. उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर मतदार घराबाहेर पडू लागल्याचे पहावयास मिळाले.