८३ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 12:37 AM2021-10-04T00:37:37+5:302021-10-04T00:38:02+5:30
नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेतील १९ आणि २१ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेला प्रारंभ झाला.
नाशिक : नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेतील १९ आणि २१ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेला प्रारंभ झाला.
याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक शिरगावकर यांनी सर्व नियमांच्या अधीन राहून राज्य स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल नासिक जिल्हा व राज्य संघटनेचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटना यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे नाशिकला टेबल टेनिस एक्सलन्स सेंटर करण्यासाठी प्रस्ताव पाठवला, तर सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच यासाठी नासिक जिमखान्याचा अद्ययावत टेबल टेनिस संकुल एक्सलन्स सेंटरसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवल्याबद्दल नासिक जिमखाना संस्थेचे आभार मानले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या सायली वाणी, तनीषा कोटेचा व प्रशिक्षक जय मोडक यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजीव बोडस यांनी राज्य संघटनेच्या वतीने मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव राधेश्याम मुंदडा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय शेटे, नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, वैभव जोशी, राधेश्याम मुंदडा, उपाध्यक्ष डॉ. शिवाजी सरोदे, उपाध्यक्षा स्मिता बोडस, दयानंद कुमार, सुनील पूर्णपात्रे, श्रीराम कोणकर, सुभाष देसाई शेखर भंडारी, संजय मोडक, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, अभिषेक छाजेड आदी उपस्थित होते. नरेंद्र छाजेड यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव देशपांडे यांनी केले. दोन्ही गटांचा बक्षीस समारंभ सोमवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी होणार आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेत सर्व मानांकित खेळाडूंनी आपले आपले सामने जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. त्यात नाशिकच्या तनीषा कोटेचा, सायली वाणी आणि कुशल चोपडा यांनी आगेकूच केली.
इन्फो
स्पर्धेचा निकाल
१९ वर्षाखालील मुली (दुसरी फेरी)
तनीषा कोटेचा (नाशिक) वि. वि. निमीषा वारंग (मुंबई सिटी ) ११-६, ११-५, ११-८
सायली वाणी (नाशिक) वि. वि. शानिका कदम (मुंबई उपनगर) ११-५, ११-५, ११-३
१९ वर्षाखालील मुले (तिसरी फेरी)
कुशल चोपडा (नाशिक) वि. वि. अद्वैत बोंद्रे (कोल्हापूर) ११-९, ११-५, ११-९,