नाशकातील बहुचर्चित धान्य घोटाळ्यात ८४ आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:17 AM2018-11-29T01:17:48+5:302018-11-29T01:18:22+5:30
जिल्ह्यातील सुरगाणा व वाडीवºहे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार, पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार तसेच गुदाम अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ८४ झाली आहे़ या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़
नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा व वाडीवºहे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार, पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार तसेच गुदाम अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ८४ झाली आहे़ या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़
सुरगाणा व वाडीवºहे येथील रेशन धान्य घोटाळा २०१५ मध्ये उघडकीस आला होता़ यामध्ये ग्रामीण पोलिसांनी धान्याची वाहतूक करणारा ठेकेदार घोरपडे बंधूसह ठाणे, कोल्हापूर येथील धान्य व्यापाºयांना अटक केली होती़ या गुन्ह्यातील बहुतांश संशयित जामिनावर आहेत़ या खटल्याबाबत विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत पोलिसांनी वाढविण्यात आलेल्या आरोपींची नावे न्यायालयास सादर केली आहेत.
यापूर्वी पोलिसांनी २६ आरोपींचा समावेश यात केला होता. परंतु नवीन आरोपींच्या समावेशामुळे ही संख्या आता ८४ झाली आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग करीत आहेत़ २०१५ पूर्वी दहा वर्षांपासून रेशनच्या धान्याची काळा बाजारात विक्री सुरू होती. त्यामुळे त्याच काळात तत्कालीन तहसीलदारांसह तत्कालीन पुरवठा अधिकारी, गुदामपाल, गुदाम कर्मचारी, रेशन दुकानदारांची नावे वाढीव आरोपींमध्ये दाखल आहेत.