संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी ८४ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:37 PM2020-06-11T21:37:33+5:302020-06-12T00:31:53+5:30

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच मास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

84 arrested for violating curfew | संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी ८४ जणांवर गुन्हे

संचारबंदीचे उल्लंघन प्रकरणी ८४ जणांवर गुन्हे

Next

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी व जमावबंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८४ नागरिकांवर कारवाई करण्यात आली तसेच मास्कचा वापर टाळणाऱ्या ५२ लोकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊनदरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच अत्यावश्यक कामासाठी गरज भासल्यास बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा, असा आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत; तरीदेखील मंगळवारी (दि.९) ४७ लोकांनी या आदेशाचा भंग केला. बुधवारी ५२ लोकांना या आदेशाचा विसर पडला. यावरून नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची उदासीनता दिसून येते. त्याचप्रमाणे मंगळवारी संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे पालन न करणाºया ७४ लोकांवरही कारवाई करण्यात आली होती.
---------------
४२२ मार्चपासून अद्यापपर्यंत भारतीय दंडविधान कलम १८८नुसार २ हजार ६२७ लोकांविरुद्ध कारवाई केली गेली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे. नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत उपाययोजना करणे अनिवार्य असल्याचे नांगरे-पाटील म्हणाले.

Web Title: 84 arrested for violating curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक