दिंडोरी नगरपंचायतीचा ८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:10 AM2018-03-24T00:10:16+5:302018-03-24T00:10:16+5:30
येथील नगरपंचायतीचा २००८ / १९ साठीचा सुमारे ८४ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अनंत जवादवार यांनी अर्थसंकल्प सादर केला .
दिंडोरी : येथील नगरपंचायतीचा २००८ / १९ साठीचा सुमारे ८४ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अनंत जवादवार यांनी अर्थसंकल्प सादर केला . त्यात शहरात विविध नागरी सेवा सुविधा विकासकामांवर भर देण्यात आला असून केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान योजना तसेच जिल्हा नियोजन विकास मंडळ आदींच्या माध्यमातुन ७५ कोटी ८७ लाखांच्या विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहे. नगर पंचायतीच्या धीतून प्रशासनसाठी ९२ लाख ७६ हजार , दिवाबत्ती साठी १०.५ लाख, पाणीपुरवठा ३६ लाख, आरोग्यसाठी २५ लाख ५५ हजार, बांधकामासाठी १ कोटी ३७ लाख आदी तरतूद करण्यात आली. उत्पन्न वाढीचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवकांनी सूचना केल्या. यावेळी भाऊसाहेब बोरस्ते यांचेसह विविध विषय समिती सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.