नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

By अझहर शेख | Published: June 3, 2023 04:05 PM2023-06-03T16:05:28+5:302023-06-03T16:09:11+5:30

धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे.

85 lakhs and gold silver in Nashik's corrupt education officer Dhangar's house | नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

नाशिकच्या लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरांच्या घरात ८५ लाख अन् ३२ तोळ्यांचे ‘धन’

googlenewsNext


नाशिक : महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.२) रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घाडगे यांच्या आदेशान्वये पथकाने त्यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेताना ८५ लाखांची रोकड व ३२ तोळ्यांचे ‘धन’ बघून पथकही अवाक् झाले. धनगरांच्या घरात प्रचंड मोठे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे.

नाशिक शहरासह जिल्हा सध्या लाचखोर सरकारी लोकसेवकांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. वर्ग-३ किंवा ४ सह आता चक्क वर्ग-१ व २चे अधिकारीसुद्धा लाच घेताना पथकाच्या हाती लागत आहे. काही दिवसांपुर्वीच जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे यांना ३० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. या आतापर्यंत मोठ्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असताना मनपाच्या महिला शिक्षणाधिकारी संशयित सुनीता धनगर यांनीही ५० हजारांची लाच स्वीकारली असता पथकाने त्यांना रंगेहात जाळ्यात घेतले. या दोन मोठ्या कारवायाने शहरात लाचखोर लोकसेवक अधिकाऱ्यांविषयी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, वालावलकर यांनी धनगरांच्या घराची झडतीचे आदेश दिले असता पथकाने त्यांचे उंटवाडी येथील ‘रचित सनशाइन’ नावाच्या घरात धडक दिली. घराची झाडाझडती घेताना तब्बल ८५लाखांची रोकड घरात आढळून आली आहे. धनगरांनी इतक्या मोठ्या संख्येने नोटांचे बंडल घरात साठवून ठेवल्याचे बघितल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

यंत्रांद्वारे काही तास नोटांची मोजदाद -
साठविलेल्या नोटा मोजण्यासाठी एकापेक्षा जास्त यंत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला आणावी लागली. यंत्रांच्या सहाय्याने काही तास नोटांची मोजदाद सुरू होती. यानंतर हा आकडा समोर आला. त्याचप्रमाणे ३२तोळ्यांचे सोन्याचांदीचे दागिणेसुद्धा घरात आढळले आहेत. यासह आडगाव शिवारात मोकळा भुखंड आणि शहरात याव्यतिरिक्त आणखी दोन फ्लॅटदेखील धनगरांच्या नावाने असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 

Web Title: 85 lakhs and gold silver in Nashik's corrupt education officer Dhangar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.