भोजापूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:44 AM2018-08-23T00:44:55+5:302018-08-23T00:45:23+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गत सप्ताहात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदी पुन्हा एकदा प्रवाहित झाली असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ८५ टक्के धरण भरल्याने परिसरातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

85 percent water stock in Bhojapur dam | भोजापूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

भोजापूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

Next
ठळक मुद्देसिन्नर तालुका : म्हाळुंगी नदी प्रवाहित

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गत सप्ताहात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदी पुन्हा एकदा प्रवाहित झाली असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ८५ टक्के धरण भरल्याने परिसरातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडल्याने ठाणगावजवळील उंबरदरी धरण १५ आॅगस्ट रोजी भरले आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सुमारे महिनाभर पावसाने विश्रांती घेतल्याने भोजापूर धरणात १७ जुलैपर्यंत ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. १६ आॅगस्टपासून पश्चिम पट्ट्यात पावसाचा पुन्हा जोर वाढल्यामुळे म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात पुन्हा एकदा १७ आॅगस्टपासून नवीन पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे. अवघ्या पाच दिवसात धरणात २०० दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. त्यामुळे ३६१ क्षमतेच्या भोजापूर धरणात बुधवारी (दि. २२) सकाळपर्यंत ३०४ दशलक्ष घनफूट पाणी म्हणजे ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
यावर्षी उन्हाळ्यात भोजापूर धरणात फक्त मृत पाणीसाठा शिल्लक होता. तुरळक झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काही भागात पेरण्या केल्या आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिना झाला आहे. परंतु अद्यापही पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही.नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागणारगतवर्षी भोजापूर धरण २५ जुलै रोजी भरले होते. तब्बल तीन महिने पूरपाणी लाभक्षेत्रात व परिसरात सुरू होते. मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह पाच गावे नळपाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर परिसाराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, यावर्षी तब्बल एक महिना उशिराने धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा लाभ क्षेत्रातील शेतक री करत आहे.

Web Title: 85 percent water stock in Bhojapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण