शहरातील ८६ टक्के रूग्ण गृह विलगीकरणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:38 PM2021-03-18T22:38:39+5:302021-03-19T01:27:49+5:30

नाशिक- शहरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने महापालिकेने एकूण ३ हजार ६३० बेडसची सज्जता ठेवली असली तरी सध्या एकूण रूग्ण संख्येपैकी १ हजार १०७ रूग्ण महापालिका आणि खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित ८६ टक्के रूग्ण गृह विलगीकरणातच उपचार घेत आहेत.

86% patients in the city in home segregation! | शहरातील ८६ टक्के रूग्ण गृह विलगीकरणात!

शहरातील ८६ टक्के रूग्ण गृह विलगीकरणात!

Next
ठळक मुद्दे१४ टक्के बेडसचा वापर: रविवारी कोरोना लॅबची चाचणी

नाशिक- शहरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने महापालिकेने एकूण ३ हजार ६३० बेडसची सज्जता ठेवली असली तरी सध्या एकूण रूग्ण संख्येपैकी १ हजार १०७ रूग्ण महापालिका आणि खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित ८६ टक्के रूग्ण गृह विलगीकरणातच उपचार घेत आहेत.

नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून १० फेब्रुवारीपासून सुरू झालेली वाढ कायम आहे. उलट गेल्या सात दिवसांपासून जिल्ह्यात तेराशे ते पंधराशे रूग्ण आढळत आहेत. त्यात आठशे ते नऊशे रूग्ण नाशिक शहरात आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा सज्जता ठेवली आहे. ३ हजार ६३० बेडस सज्ज ठेवण्यात आले आहेत. यात १ हजार १०७ रूग्णालयात आहेत. म्हणजेच १४ टक्के बेडसचा वापर होत असून उर्वरित ८६ टक्के रूग्ण तूर्तास घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर्सची लगेचच गरज भासणार नसली तरी शहरातील रूग्ण संख्या वाढीचा वेग अशाच प्रकारे वाढत राहिल्यास सेंटर्स देखील सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
कोरोना विरोधात लढण्यासाठी महापालिकेच्या वतीने सज्जता करण्यात येत असताना कंत्राटी पद्धतीने पुन्हा वैद्यकीय विभागात भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पाचशे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र त्यातील तीनशे कर्मचारी रूजू झाले आहेत. आताही भरतीसाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे.

लॅबची रविवारी चाचणी
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॅबची चाचणी येत्या रविवारी (दि.२१) घेण्यात येणार असून दोन नमुन्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यातील अचूकता तपासण्यासाठी आयसीएमआरकडे देखील नमुने पाठवण्यात येणार आहे. सुरूवातीला दीड ते दोन हजार इतक्या नमुन्यांच्या तपासणीची क्षमता असेल त्यानंतर मात्र ती वाढवण्यात येणार आहे.

Web Title: 86% patients in the city in home segregation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.