मालेगावचे ८७ कामगार अडकले गुजरात राज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:32 PM2020-04-28T20:32:43+5:302020-04-28T23:03:45+5:30
मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड येथील ८७ ऊसतोड कामगार लॉकडाउनमुळे एक महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले असून, शासनाने त्यांना परत आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड येथील ८७ ऊसतोड कामगार लॉकडाउनमुळे एक महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले असून, शासनाने त्यांना परत आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
गुगुळवाड येथील आदिवासी भील्ल समाजाचे ८७ ऊसतोडणी कामगार दरवर्षाप्रमाणे बारडोलीजवळील महू या साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी गेलेले होते. अचानक सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे ते सर्व कामगार एक महिन्यापासून अधिक काळ तेथेच अडकून पडलेले आहेत. त्यांच्यात लहान मुले तसेच एक गरोदर महिला असून, रावा सोनवणे या ऊसतोडणी कामगाराची प्रकृती बिघडलेली आहे. त्यांच्या जवळ अन्नधान्य तसेच पैसे नसल्याने त्यांची तेथे प्रचंड हालअपेष्टा उपासमार होत आहे. यासंदर्भात तहसीलदार चंद्रजितसिंह राजपूत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, त्यांची यादी पाठवा आणि गुजरात सरकारला आम्ही त्यांची खाण्यापिण्याची व दवाखान्याची व्यवस्था करायला सांगतो, ८७ कामगारांची विहित नमुन्यातील यादी तहसीलदारांना दिलेली आहे; परंतु कामगार आता तेथे राहायला तयार नाहीत. गुजरात प्रशासन त्यांना नवापूरपर्यंत सोडायला तयार आहे, ते म्हणतात की नवापूरपासून आम्ही पायी यायला तयार आहोत; परंतु आठ महिन्यांची गरोदर महिला व एक गंभीर आजाराचे रुग्ण झाल्याने आम्ही त्यांना तूर्त येण्यास नकार दिलेला आहे, गुगुळवाडचे सरपंच लहू सोनवणे यांचा मुलगा देवा सोनवणे हा मुकादम असून, त्याने ते सर्व कामगार नेलेले आहेत, असे येथील सामाजिक कार्यकर्ते आर. डी. निकम यांनी सांगितले.
----
कोटाला शिकायला गेलेल्या सुखवस्तू व श्रीमंत घरातील मुलांसाठी १०० बसेस पाठवणार असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटलेले आहे, आणि या गरीब मजुरांसाठी सरकार काहीच करू शकत नाही का?
- आर.डी. निकम, सामाजिक कार्यकर्ते, गुगुळवाड