गवंडगाव ग्रामपंचायतीसाठी ८७ टक्के मतदान
By admin | Published: December 19, 2015 11:29 PM2015-12-19T23:29:08+5:302015-12-19T23:31:21+5:30
गवंडगाव ग्रामपंचायतीसाठी ८७ टक्के मतदान
अंदरसूल : येवला तालुक्यातील गवंडगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पडली. यात सत्ताधारी पॅनलच्या विरोधात जनशक्ती विकास पॅनलने आपले उमेदवार उभे केले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत या ग्रामपंचायतीसाठी एकूण तीन वॉर्ड होते. यंदा चौथ्या वॉर्डची निर्मिती झाल्याने सदस्य संख्या नऊवरून अकरा झाली, त्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली होती. एकूण २०४७ मतदारपैकी १७६६ व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला सायंकाळपर्यंत एकूण ८७ टक्के मतदान झाले.
सत्ताधारी पॅनलच्या विद्यमान सरपंच योगिता दिलीप भागवत यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास प्रगती पॅनलचे नेते दिलीप भागवत, संजय भागवत, अप्पासाहेब भागवत, भाऊसाहेब भागवत, रामदास भागवत यांनी सर्वानुमते व्यक्त केला. यात दलित वस्ती रस्ता काँक्रीटीकरण, नवीन अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी कंपाउंड तसेच दोन पाझर तलाव आदि कामे पार पाडली. विरोधी पॅनल जनशक्तीचे रावसाहेब भागवत, डॉ. सुदाम भागवत, सोमनाथ भागवत, यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी कंबर
कसली होती परंतु गवंडगाववासीय कोणाच्या बाजूने कौल देतात हे
सोमवारी (दि. २१) स्पष्ट होईल.
या निवडणुकीत प्रगती पॅनलकडून दशरथ गायकवाड, सुदाम मोरे, अलका गायकवाड, नितीन भागवत, सुवर्णा सोमासे, अरुणा गायकवाड, संजय भागवत, सुंदरा भागवत, रुपचंद भागवत, छाया वडाळकर, सुशीला भागवत, तर जनशक्ती पॅनलकडून विशाल गायकवाड, किरण गोरे, सुप्रभा गायकवाड, यननाथ भागवत, कांचन भागवत, मनीषा भागवत, संतोष भागवत, बाळू भागवत, भारती भागवत, गीताबाई भागवत, जयश्री भागवत रिंगणात आहेत.